आपल्याला माहित आहे की बऱ्याचदा बाजार समिती असो की साखर कारखाने यामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल मोजताना काटामारीच्या घटना घडतात. त्यासंबंधीच्या बऱ्याच तक्रारी देखील दाखल करण्यात येतात. काटामारी केल्यामुळे शेतकरी बंधूंचे फार मोठे आर्थिक नुकसान होते. या अनुषंगाने राज्यातील सर्व साखर कारखान्याचे वजन काटे तातडीने ऑनलाईन करा, अशा आशयाची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि वैद्यमापन नियंत्रण डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांच्याकडे केली आहे.
त्यानुसार आता सिंघल यांनी साखर कारखान्यांचे वजन काटे हे संगणकीय प्रणालीद्वारे एकत्र करून तातडीने ऑनलाइन करण्याचे निर्देश देखील संबंधित विभागाला दिले. राज्यातील कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करून त्या काट्यांचे कॅलिब्रेशनमध्ये पारदर्शकता आणून संगणक प्रणाली एकच ठेवावी,
एवढेच नाही तर त्यांचे कॅलिब्रेशन नियंत्रण वैद्यमापन विभागाकडूनच व्हावी अशी मागणी ही राजू शेट्टी यांनी यावेळी केली. उसाचे वजन काटे हे अचूक असणे खूप गरजेचे आहे कारण बऱ्याचदा वजन काट्यांमध्ये पारदर्शकता नसल्यामुळे वजनामध्ये मोठा फरक दिसून येतो.
बऱ्याचदा खाजगी काट्यावर वजन केलेला ऊस साखर कारखानदार नाकारात असल्याच्या तक्रारी समोर आले आहेत. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना पावत्या दिल्या जात नाही. यासाठी हा विषय फार गंभीर असून त्याकडे गंभीर्याने पाहणे गरजेचे आहे. यासाठी वैद्य मापन विभागाकडून त्वरित कार्यवाही करून साखर कारखान्याचे वजन काट्यांच्या कॅलिब्रेशन मध्ये एकसमानता,
सुसूत्रता व पारदर्शकता राहण्यासाठी सर्व वजन काट्यांची ऍक्टिव्ह संगणक प्रणाली एकच असणे व त्यांचे कॅलिब्रेशन नियंत्रण वैध मापन विभागाकडून व्हावे यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. साखर कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करण्यासंबंधीचा ठराव हा जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत एक मुखाने घेण्यात आला होता.
Share your comments