1. बातम्या

Soyabean Rate: येणाऱ्या काही दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता, 'ही' आहेत त्यामधील प्रमुख कारणे

जर आपण सध्याच्या सोयाबीन बाजारभावाचा विचार केला तर तो स्थिर असून सध्या प्रतिक्विंटल चार हजार दोनशे ते पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत दर मिळत आहेत.बाजारपेठेमध्ये जे काही सोयाबीन विक्रीला येत आहे त्याची प्रत घसरलेली असल्याकारणाने दर कमी मिळत असल्याची एकंदरीत परिस्थिती आहे. ऐन सोयाबीन काढणीचे काम सुरू असतानाच महाराष्ट्रमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला व बऱ्याच ठिकाणी सोयाबीन ओले झाले.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
soyabean rate situation

soyabean rate situation

जर आपण सध्याच्या सोयाबीन बाजारभावाचा विचार केला तर तो स्थिर असून सध्या प्रतिक्विंटल चार हजार दोनशे ते पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत दर मिळत आहेत.बाजारपेठेमध्ये जे काही सोयाबीन विक्रीला येत आहे त्याची प्रत घसरलेली असल्याकारणाने  दर कमी मिळत असल्याची एकंदरीत परिस्थिती आहे. ऐन सोयाबीन काढणीचे काम सुरू असतानाच महाराष्ट्रमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला व बऱ्याच ठिकाणी सोयाबीन ओले झाले.

जर आपण सध्या देशातील आणि महाराष्ट्रातील बाजार समिती यांचा विचार केला तर हळूहळू सोयाबीनचे आवक वाढत असून सोयाबीन उत्पादक पट्ट्यांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीन काढण्याच्या कामांना वेग आला असून आता पाऊस नसल्यामुळे सोयाबीन मधील ओलावा देखील कमी होण्यास मदत होत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देखील शेतकरी बंधूंनी सोयाबीन काढण्याच्या कामाला वेग दिला आहे.

नक्की वाचा:सोयाबीनच्या दरात सुधारणा; किती मिळतोय बाजारभाव? जाणून घ्या

 सध्याची सोयाबीनची परिस्थिती आणि बाजार समित्यांमधील बाजार भाव

 गेल्या आठवड्याभरापासून राज्यामध्ये पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीनच्या काढणीला वेग आला असून मोठ्या प्रमाणावर सोयाबीन सध्या बाजारपेठेत येऊ लागले आहे.

तसेच महाराष्ट्रातील प्रमुख सोयाबीन उत्पादक पट्टा जसे की, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये  झालेल्या पावसाने मालाचा दर्जा घसरला आहे. त्यामुळे शेतकरी मळणी नंतर लगेचच सोयाबीन विक्रीसाठी आणण्याला प्राधान्य देत आहेत.

चांगल्या प्रतीचे जे काही सोयाबीन आहे ते शेतकरी विक्रीसाठी आणत नसून साठवणूक करण्यावर भर देत आहे. दिवाळीच्या निमित्ताने  अनेक बाजार समित्या बंद होत्या व त्यामुळे शेतकऱ्यांनी शिवारातच सोयाबीन विकण्याला प्राधान्य दिले. सध्या सोयाबीनमध्ये मॉइश्चर अर्थात आद्रतेचे प्रमाण  जास्त असल्यामुळे काही ठिकाणी प्रतिक्विंटल चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका बाजार भाव मिळत आहे.

नक्की वाचा:Kanda Bajar Bhav: या बाजारसमितीत कांद्याला मिळाला 5000 रुपयांचा भाव

येणाऱ्या काळात सोयाबीन बाजार भाव वाढण्यासाठी ठरू शकतात ही कारणे महत्त्वाची

 तसेच आता पावसाने उघडीप दिल्यामुळे मोकळे वातावरण असल्याने सोयाबीन वाळवण्याकडे शेतकऱ्यांनी भर दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात जे सोयाबीन विक्रीसाठी बाजारपेठेतील त्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण कमी राहणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

सध्या पावसात ओले झालेले म्हणजेच आद्रता असलेले सोयाबीन विक्रीला येण्याचे प्रमाण आता कमी होत आहे. त्यामुळे बाजारभावामध्ये थोड्या प्रमाणात का होईना सुधारणा झालेली पाहायला मिळत आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोयाबीनच्या दरात थोडीफार सुधारणा झाली असून  सोयाबीनचे बाजारभावाने 14 डॉलरच्या पातळीवर पोहोचला होता. जर आपण सोयाबीन वायद्यांचा विचार केला तर डिसेंबर सोयाबीनचे वायदे  काल 1400 सेंन्ट प्रतिबुशेल्स वर बंद झाले.

जर आपण दोन महिन्याच्या कालावधीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनची किंमत 13 ते 14 डॉलर प्रतिबुशेल इतकी आहे. जर आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा एकंदरीत विचार केला तर सोयाबीन व सोयाबीनची पेंडीचे दरात सुधारणा झाल्यामुळे भारतीय बाजारात देखील याचा आधार मिळू शकतो असे जाणकार यांचे म्हणणे.

या सगळ्या कारणांमुळे सध्या किमान बाजारभावात वाढ झाली असून एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनला पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपये भाव मिळत आहे. जर आपण सध्याच्या सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्याचे स्थिती पाहिली तर येणाऱ्या काही दिवसात सोयाबीनचा बाजार भाव ५५०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत राहण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे शेतकरी बंधूंनी बाजाराचा आढावा घ्यावा व त्यानंतरच सोयाबीन विकावे, असा सल्ला देखील जाणकार देत आहेत.

नक्की वाचा:Agri News: शेतकरी पुत्रांचा 'ऑनलाइन ट्रेंड'! ओला दुष्काळ प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारलेल्या ट्रेंडला सगळ्या थरातून भरघोस प्रतिसाद

English Summary: this is some condition caused to growth soyabean rate in will be coming few days Published on: 28 October 2022, 05:22 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters