Nagpur Rain News :
नागपुरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागाच मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसंच शहरात ढगफुटीसदृश्य पावसाने हजेरी लावल्याने नाग नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी नदीकाठच्या गावांमध्ये शिरल्याने अनेक घरांचं, वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.
दोन दिवसांपूर्वी नागपुरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नागनदीला पूर आला आहे. नाग नदीकाठच्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. या नुकसानग्रस्त भागांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी पाहणी देखील केली आहे. तसंच यावेळी फडणवीस यांच्यासमोर नुकसानग्रस्तांनी व्यथा मांडली आहे.
नागपुरात जोरदार पाऊस झाल्यामुळे नागनदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी संजीव हजारी, सेपू अपार्टमेंट, अतकरी, माणके पाटील, रमेश विलोनकर, पांडुरंग आणि हाडकर, नवनाथ बागवाले आणि सत्यसाई सोसायटीमधील घरात शिरले आहे. या पुराच्या पाण्यात घरांचं, संरक्षण भिंतीचं, चारचाकी आणि दुचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. शनिवारला सकाळी चार ते साडे पाचपर्यंत विजांच्या भयावह गडगडाटीसह रेकाँर्ड ब्रेक मुसळधार पाऊस झाला आहे.
नागपुर शहरात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आवश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. नदी नाल्यांमध्ये पाणी असल्यामुळे पूल ओलांडू नये. पाणी कमी झाल्यानंतरच पूल ओलांडावा. अंबाझरी तलावाचे पाणी ओव्हरफ्लो झालेले आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांकडे लक्ष देऊ नये. तलाव अथवा ओव्हरफ्लोकडे कुणीही जाण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन नागपूर महानगरपालिकेकडून नागरिाकांना करण्यात आले आहे.
Share your comments