1. बातम्या

16 तारखेच्या नंतर राज्यात बसरणार पाऊस, 5 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून High अलर्ट

मागील काही दिवसांपासून उत्तर भारत विभागामध्ये पाऊसाने तसेच हिमवृष्टीने चांगलीच धो धो लावलेली आहे. पण आता उत्तर भारतातील पाऊसाने थोडी विश्रांती घेतली असल्यामुळे थंडीचा कडाका सुद्धा कमी झालेला आहे. परंतु दक्षिण भारतामधील ईशान्य बाजूकडील पुन्हा एकदा वारे सक्रिय झाले असल्यामुळे दक्षिण तमिळनाडू तसेच पोंडेचरी, कराईकल, दक्षिण केरळ व माहे परिसरामध्ये पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. येईल या २४ तासांमध्ये दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ भागामध्ये विजांचा कडकडाटसह जोरात पाऊस पडणार असल्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे. तसेच संबंधित राज्यात अनेक ठिकाणी आज हवामान खात्याने अलर्ट दिलेला आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
rainfall

या जिल्ह्यात कोसळणार पाऊस :-

या अशा परिस्थिती चा काहीसा परिणाम महाराष्ट्र राज्यावर देखील होणार असल्याचे सांगितले आहे. जे की पुढील दोन दिवसात राज्यामध्ये कोरडे हवामान राहणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे. तर १८ फेब्रुवारी रोजी हवामान खात्याने नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा तसेच गडचिरोली या पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलेला आहे. या ५ जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होणार असून हलक्या तसेच मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार असल्याचे सांगितले गेले आहे. मागील दोन दिवसांपासून विदर्भ भागामध्ये किमान तसेच कमाल तापमानामध्ये थोड्या प्रमाणात वाढ झालेली असून तिथे गरमी चे प्रमाण देखील वाढले आहे.

या जिल्ह्यात तापमान वाढले :-

महाराष्ट्र राज्यात काही भागात थंडीचा जोर ओसरला असल्यामुळे किमान व कमाल तापमानात वाढ झालेली आहे. तर आज महाबळेश्वर मध्ये १४.६ तसेच सातारा मध्ये १४.७, सोलापूरमध्ये १५.५, कोल्हापूरमध्ये १८.१, सांगलीमध्ये १६.७, जळगावमध्ये १०, मालेगावमध्ये ११, पुण्यात १३.३, बारामतीमध्ये १२.४, नाशिकमध्ये ११.७, परभणीमध्ये १३.६, जालन्यात १४.३, उस्मानाबादमध्ये १४, चिखलठाणामध्ये १२, नांदेडमध्ये १३.४, मुंबईमध्ये १९, डहाणूमध्ये १७.९, ठाण्यात २०, माथेरानमध्ये १८.६, हरनाईमध्ये २१.८ आणि रत्नागिरीत 19.7 अंश अशा प्रकारे किमान तापमानाची नोंद झालेली आहे.

४-५ अंश तापमान वाढणार :-

यासोबतच येत्या ४ दिवसांमध्ये वायव्यकडे बहुतांश भागामध्ये किमान तापमानात २-४ अंश डिग्री सेल्सिअस तापमान वाढणार असल्याचे  सांगितले  जात  आहे. तर पुढील  ४-५  दिवसामध्ये बऱ्याच भागात ३-५ अंश डिग्री सेल्सिअस तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. येईल या काही काळामध्ये वायव्य तसेच मध्य भारतामध्ये थंडीचा  जोर  कमी  होणार  असल्याचे सांगितले जात आहे. फेब्रुवारी च्या शेवटच्या आठवड्यात व मार्च च्या पहिल्या आठवड्यात तापमानात चांगलीच वाढ होईल तसेच ही वाढ  दिवसेंदिवस  होणार असल्याने या वेळीचा उन्हाळा चांगला कडाक्याचा जाणार आहे.

English Summary: Rainfall in the state after 16th, High alert from Meteorological Department to 5 districts Published on: 15 February 2022, 05:24 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters