उन्हाचा तडाखा सहन करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येतं आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सूनची स्वारी भारतात वेळेपूर्वी दाखल होणार आहे. खरं पाहता ही बातमी संपूर्ण देशवासीयांसाठी महत्त्वाची आहे मात्र शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आणि जिव्हाळ्याची आहे. एकीकडे मान्सूनमुळे नागरिकांना उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा मिळणार आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीचा हा पाऊस वरदान ठरणार आहे.
भारतीय हवामान खात्यानुसार, 20 मे नंतर मान्सून भारतात दाखल होणार आहे. मित्रांनो भारतात सर्वप्रथम मान्सून केरळमध्ये हजेरी लावत असतो आणि भारतीय हवामान खात्यानुसार 20 मे नंतर कधीही मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो.
मागील वर्षाचा अनुभव बघता दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी किंवा त्याच्या आसपास भारतात मान्सून दस्तक देत असतो. मात्र यावेळी मान्सून वेळेपूर्वी भारतात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा झाला तर यावर्षी 20 ते 22 दिवस अगोदर पावसाची हजेरी हे ठरलेली आहे.
महत्वाच्या बातम्या:
केंद्रीय कृषिमंत्री पुढील आठवड्यात इस्रायलच्या दौऱ्यावर
पंजाब कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
वेळेआधीच पावसाळा सुरू होईल
टाइम्स ऑफ इंडियाने आयआयटीएमच्या एका तज्ज्ञाच्या हवाल्याने लिहिले आहे की, 20 मे नंतर केरळमध्ये मान्सूनची सुरुवात कधीही होऊ शकते. अहवालानुसार, 28 एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या शेवटच्या विस्तारित श्रेणी अंदाजानुसार, 19-25 मे या कालावधीत केरळमध्ये पावसाच्या हालचालींमध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अशा परिस्थितीत 2022 मध्ये म्हणजे यंदा मान्सून 20 मे नंतर केव्हाही दाखल होऊ शकतो. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत आहे.
केरळमध्ये वेळेआधी मान्सून दाखल होणार
हाती आलेल्या माहितीनुसार, "पुढील एक आठवडा अशीच शक्यता दिसली, तर केरळच्या किनारी राज्यात मान्सूनची सुरुवात निश्चितच वेळेपूर्वी होईल. येत्या आठवडाभरात मान्सून केरळमध्ये केव्हा दाखल होणार हे नक्की होईल, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बंगालच्या उपसागरात पुन्हा खळबळ, चक्रीवादळाची शक्यता
आयआयटीएमच्या तज्ज्ञांच्या मते, सध्या केरळमध्ये मान्सून लवकर येण्याची चिन्हे दिसत आहेत. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होणार आहे. यामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सूनचा प्रवाह मजबूत होण्यास मदत होऊ शकते. मान्सूनचा प्रवाह तिसऱ्या आठवड्याच्या आसपास खंडित होण्याची शक्यता नाही, कारण तोपर्यंत त्याचा प्रभाव कमी झालेला असेल.
Share your comments