मॉन्सूनचा आस पाकिस्तानात असलेल्या पश्चिमी चक्रवातीची स्थिती त्यापासून कोकणापर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा यामुळे वाऱ्याचे प्रवाह बदलले आहेत. अरबी समुद्रावरून येणारे बाषप उत्तरेकडे ओढले गेल्याने राज्यात पावसाने उडीप दिली आहे. मात्र उद्यापासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा आणि काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे आणि मुंबईतही पावसाचा अंदाज आहे. २७ जुलै रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याच्या वाऱ्यासह वारा वाहण्याचा इशारा आहे.
मंगळवारी २८ जुलै रोजी कोकण, गोव्यात आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे
गेले काही दिवस मराठवाडा, खान्देश, विदर्भातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर दोन दिवस मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. कोकणातही हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. मंगळपर्यंत कोकण वगळता बहुतांशी ठिकाणी पावसाची उघडीप राहणार आहे. त्यानंतर राज्यात पुन्हा पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे.
Share your comments