हवामान विभाग खात्याने २२, २३ जानेवारी रोजी कोकण विभाग तसेच मध्य महाराष्ट्रमध्ये पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे तसेच काही भागात तुरळक प्रमाणत गारपीठ पडेल असे सांगितले आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये २२ आणि २३ जानेवारी ला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने लावलेला आहे. मागील वेळी हवामान खात्याने जो अवकाळी तसेच गारपिटीचा अंदाज वर्तविला होता त्या अंदाजाप्रमाणे अनेक भागात अवकाळी पाऊस तर गारपीठ झालेली आहे.
उंच भागात बर्फवृष्टी सुरु आहे :
अवकाळी पाऊस पडल्यामुळे राज्यात थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढले होते तसेच काही भागात गारपीठ पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील तीन दिवसामध्ये लडाख, जम्मू काश्मीर, बाल्टिस्तान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश तसेच गिलगिट भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. उंच भागात बर्फवृष्टी होणार आहे तसेच सखोल भागात पाऊसामुळे तापमान कमी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली मध्ये तापमानाचा पारा घसरल्यामुळे थंडीची लाट उसळली आहे. त्यामध्ये पुन्हा पाऊस पडला असल्यामुळे थंडी अजूनच वाढेल अशी शक्यता हवामान खात्याने लावली आहे.
राज्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून थंडीमुळे लोकांमध्ये हुडहुडी भरलेली आहे आणि त्यात पाऊसाने हजेरी लावली आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे आणि अवकाळी पावसामुळे लोक हैराण झाले आहेत. थंडीमध्ये पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतात जे पीक लावले आहे त्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही पिके थंडीत जोमाने वाढतात त्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक कष्ट परिश्रम घेतले मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
२२ जानेवारी व २३ जानेवारी रोजी राज्यातील काही भागात तुरळक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे आणि त्यात कोकण व मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल असे हवामान खात्याने म्हणले आहे आहे. या दोन दिवशी ढगाळ वातावरण सुद्धा राहील असेही हवामान विभागाने सांगितले आहे.
Share your comments