रत्नागिरीत सुरु असलेल्या जोराच्या पावसामुळे वाशिष्टी नदी आणि खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवरुन वाहू लागल्या आहेत. त्यामुळे या नदीकाठच्या गावांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरीत सुरु असलेल्या जोराच्या पावसामुळे वाशिष्टी नदी आणि खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवरुन वाहू लागल्या आहेत. त्यामुळे या नदीकाठच्या गावांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. तसंच चिपळूणमध्ये एनडीआरएफचं पथक देखील दाखल आहे.
राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कोकणासह मध्ये महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे.
दरम्यान, मुसळधार पाऊस पडणाऱ्या भागातील नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तसंच वाशिष्टी नदीपात्र परिसरात न जाण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
English Summary: Rain Konkan Update Vashti, Jagbudi river from warning levelPublished on: 19 July 2023, 01:01 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments