पावसामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर दाणादाण उडाली आहे. यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना हवामान खात्याने पुढील तीन दिवस २२ हून अधिक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसह संपूर्ण उत्तर पश्चिम भारत ते ईशान्य आणि दक्षिण भारत राज्यांचा समावेश आहे. बुधवारी मध्य महाराष्ट्र, पूर्व गुजरात, कोकण, गोवा, तेलंगणा, रॉयल सीमा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे.
यामध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि चंदीगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे आता पुढील काही दिवस महत्वाचे आहेत.
ऊस तोडणी यंत्र वापरातील आव्हाने
तसेच केदारनाथ यात्रा सुरूच आहे. राज्यात सध्या ५० रस्ते बंद असून सुमारे ४० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. ४०० छोटे-मोठे कालवे वाहून गेले आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
हरिद्वारमध्ये, गंगा अजूनही २९३.४५ मीटरवर, धोक्याच्या चिन्हाच्या वर वाहत आहे. तसेच कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात, घरात पाणी शिरले आहे.
राज्यभर पावसाचा जोर वाढतच राहणार, हवामान खात्याने सांगितलं कारण...
गंगा, यमुना, घग्गर, हिंडन यासह सर्व प्रमुख नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत असून अनेक भाग पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. यामुळे आता नद्या पुन्हा एकदा वाढल्या आहेत. यामुळे पाणीच पाणी बघायला मिळत आहे.
जावं तिथं फक्त अश्रूंचा बांध फुटतोय..! नि:शब्द झालोय..!
दुधाला 34 रुपये दराचा शासनाचा अध्यादेश म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार! राजू शेट्टी यांनी थेट फसवणुकीचे उदाहरणच दिले
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या ग्राफिक्स वरील वक्तव्यावर खुलासा, राजू शेट्टी यांना केला फोन, आणि...
Share your comments