Rain News : राज्याच्या या भागात पावसाची संततधार सुरुच; पिकांचे नुकसान
पावसाच्या संततधारेमुळे शेतात तण वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. ते नियंत्रण करण्यासाठी तणनाशकांचा उपयोग करावा लागेल. पण त्यासाठी पावसाची विश्रांती हवी आहे.
खानदेशात मागील चार-पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. पावसामुळे शेती कामे खोळबंली असून पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे.
पाऊस थांबत नसल्याने तणनाशकांची फवारणीदेखील शेतकरी करू शकत नसल्याचे दिसत आहे. पाऊस असाच सुरू राहील्यास पिकहानी आणखी वाढेल, अशीही भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नंदुरबारातील अक्कलकुवा तालुक्यातील देहली प्रकल्पही १०० टक्के भरला असून, त्याची जलपातळी १९७ मिटरवर पोचली आहे. तसेच शहादामधील सुसरी, दरा प्रकल्पातील जलसाठाही वाढला आहे.
दरम्यान, आजही राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. काही भागात पावसाचा जोर जास्त होता. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडला. इतर भागात मात्र पावसाची उघडीप पाहायला मिळाली.
English Summary: Rain continues in Jalgaon Damage to cropsPublished on: 25 July 2023, 05:38 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments