1. बातम्या

Radhakrishna Vikhe Patil : पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांनाच मागितले पैसे, व्हिडिओ वायरल

सध्या राज्यात पडणाऱ्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतल्याने बळीराजा चिंतेत आहे. सरकारने नुकसानीचे पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात आहे.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil

सध्या राज्यात पडणाऱ्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतल्याने बळीराजा चिंतेत आहे. सरकारने नुकसानीचे पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात आहे. मात्र पिकांच्या पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडूनच चक्क एकेरी चारशे रुपयांची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा प्रकार राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil यांच्या जिल्ह्यात घडल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

या भागात सोयाबीन पिकासह इतर अनेक पिकांचे अतोनात नुकसान झालेलं आहे. यामुळे काही दिवसांपूर्वीच नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी दौरा पूर्ण केला होता. आणि दौरा केल्यानंतरच असा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

भाजीपाला महागला; शेवगा 200 रुपये किलो, जाणून घ्या इतर भाज्यांचे दर

नेवासे तालुक्यामध्ये एक पथक पंचनामा करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांनी संबंधित शेतकऱ्याला एकरी चारशे रुपये पैसे देण्यास सांगितले. मात्र संबंधित शेतकऱ्याने त्याचा विरोध केला. या सर्व बाबींचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालेला असून सोशल मीडिया वर प्रचंड वायरल झाला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भागातील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती.

मोठी बातमी: ...तर एक नोव्हेंबरपासून गॅस सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार नाही; जाणून घ्या...

असं असलं तरी या प्रकारामुळे शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आधीच अतिवृष्टी, त्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं न भरून निघणार नुकसान केलं आहे. त्यात राज्यातील अनेक भागात पंचनामे न झाल्याने शेतकरी मदतीपासुन वंचित आहेत.

त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या सत्रात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान पैसे मागण्याच्या प्रवृत्तींवर आता महसूलमंत्री विखे पाटील आणि प्रशासन काेणती कारवाई करणार याकडे शेतक-यांचे लक्ष लागून राहिले आहे.

मानलं रे! जळगावमध्ये शेतकऱ्यांने केळीच्या शेतीतून कमावले तब्बल एक कोटी रुपये

English Summary: Radhakrishna Vikhe Patil: Farmers are asked for money for Panchnama Published on: 31 October 2022, 03:29 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters