राज्यात सर्वत्र रब्बी हंगामातील कांदा (Rabbi season onion) लागवडीसाठी शेतकरी बांधव लगबग करताना दिसत आहेत. यंदा खरीप हंगामातील लाल कांद्याला (To the red onion of kharif season) अपेक्षा सारखा भाव मिळतांना दिसत आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरीरब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करताना दिसत आहेत. असे असले तरी नाशिक जिल्ह्यातील विशेषता कसमादे पट्ट्यात नुकतेच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा लागवडीला ब्रेक (Break on onion cultivation) लागताना दिसत आहे. बदलत्या हवामानामुळे कांदा लागवडीला उशीर होताना दिसत आहे, यंदा कांदा लागवड ही जानेवारी अखेरपर्यंत चालण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील विशेषता कसमादे पट्ट्यातील सर्व शेतकरी कांदा लागवडीत व्यस्त आहेत.
कसमादे पट्ट्यात अनेक शेतकरी बाहेरगावाहून कांदा लागवडीसाठी मजूर आणत आहेत. सर्व कांदा उत्पादक शेतकर्यांचा लवकरात लवकर कांदा लागवड (Onion planting) करण्याचा निर्धार आहे, मात्र असे असले तरी परिसरात मजुरांअभावी आणि अवकाळी पावसामुळे (Due to lack of labor and untimely rains) कांदा लागवड होण्यास विलंब होत आहे. तसेच यावर्षी कांदा लागवडीसाठी खर्चात देखील वाढ होताना दिसत आहे. कांदा लागवडीसाठी सुमारे 12 हजार रुपये एकरी मजुरी खर्च होत आहे, याव्यतिरिक्त कांदा जोपासण्यासाठी येणारा खर्च हा देखील दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी यावर्षी कांद्याला चांगला बाजारभाव प्राप्त होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करताना नजरेस पडत आहेत.
कसमादे पट्ट्यात जानेवारी अखेरपर्यंत कांदा लागवड सुरू राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कांदा लागवडीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात आधुनिक तंत्राचा देखील वापर केला जात आहे. प्रवरा तालुक्यातील वळाली येथील शेतकरी नितीन दुस यांनी ट्रॅक्टर प्लांटर चा उपयोग करून यावर्षी कांदा लागवड केली आहे. त्यांनी आधुनिक तंत्राचा उपयोग करून जवळपास पाच एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली आहे. नितीन सांगतात की पूर्वी त्यांना कांदा लागवड करण्यासाठी पाच एकर क्षेत्रात 28 दिवस काम करावे लागत आणि जवळपास 175 मजूर लागवडीसाठी लागत होते. मात्र या आधुनिक तंत्राद्वारे पाच एकर कांदा लागवड अवघ्या 56 माणसातच केली गेली. त्यामुळे नितीन यांची मजूर शोधाशोध ची डोकेदुखी देखील कमी झाली. आणि विशेष म्हणजे वेळेत कांदा लागवड नितीन यांनी उरकवून घेतली.
यावर्षी बंपर उत्पादनाची आशा
यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष डाळिंब या फळबागांवर विपरीत परिणाम घडून आला आहे. डाळींब व द्राक्ष या फळबागांपासून शेतकऱ्यांना कवडीचेही उत्पन्न प्राप्त झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व लक्ष कांदा या नगदी पिकांकडे लागले आहे. आणि म्हणूनच रब्बी हंगामात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे, आणि त्यामुळे यावर्षी कांद्याचे बंपर उत्पादन निघणार अशी आशा तज्ञ व्यक्त करत आहेत.
Share your comments