सध्या पावसाने दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पूर आला आहे. आता बारामती तालुक्यातील पश्चिम भागामध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस पडला आहे. यामुळे नद्या, ओढे भरून वाहत आहेत. यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अजूनही हा पाऊस सुरूच आहे. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
अनेक गावांमध्ये ओढय़ा नाल्यांना पूर आला आहे. नीरा बारामती रस्त्यावरील अनेक पूल ओढ्याच्या पुराच्या पाण्याखाली गेली असून वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या पावसामुळे बारामती तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तालुक्याशी तुटला आहे. यामुळे अनेकांच्या घराचे गुरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे.
असे असताना नीरा बारामती रस्त्यावरील फरांदेनगर येथील ओढ्यावर पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीला तेथील स्थानिक युवकांनी ट्रॅक्टरवर दोरीच्या साहाय्याने वाचवले आहे. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. कऱ्हा नदी आता दुथडी भरुन वाहू लागली आहे. नाजरे धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांना देखील जलसंपदा विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गणपती आल्यापासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
पाकिस्तानमध्ये टोमॅटो 500 रुपये किलो, निर्यात करून शेतकऱ्यांना दिलासा द्या, पंतप्रधानांना पत्र
आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहून, बगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. पुण्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे.
महत्वाच्या बातम्या;
राज्य सहकार मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषद दिल्लीत होणार, सहकारासंबंधी मोठे निर्णय होण्याची शक्यता..
राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
... तर दंड भरावाच लागणार! सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर गडकरींचा मोठा निर्णय
Share your comments