गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. भाज्यांना बाजारभाव नाहीत तर अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कांद्याचा भाव पडला आहे, अतिरिक्त उसाचा प्रश्न देखील तसाच आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील (Puntamba) पुणतांबा येथील शेतकरी आंदोलन करत आहेत. हे शेतकरी रोज वेगवेगळ्या पध्दतीने (State Government) सरकारचा निषेध केला जात आहे.
2017 मध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला होता. यावेळीही शेतकऱ्यांनी पाठींबा देण्यास सुरवात केली असून राज्यात अनेक याला पाठींबा मिळत आहे. आता नाशिक जिल्ह्यातील सटाण्याच्या मुंजवाड येथेही (Dharna movement) धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील शेतकरी याठिकाणी एकवटले असून शेतकऱ्यांच्या मागण्या ते ठाम आहेत. यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणतांबा येथील किसान क्रांतीच्या आंदोलनाचे पडसाद आता नाशिकच्या बागलाण मध्येही दिसून आले असून बागलाणतालुक्यातील मुंजवाड गावातील शेतऱ्यांनीही आंदोलन सुरू करत साथ साथ दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील मुंजवाड येथे धरणे आंदोलन सुरु करण्यापूर्वी परिसरातील 15 गावच्या ग्रामसभेत ठराव संमत करुन आंदोलनाची दिशा ठरवली आहे. यामुळे आता शेतकरी अधिकच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
व्यापाऱ्यांनी कांदा विकला नाही, मग शेतकऱ्यांनी दाखवला हिसका, शेतकऱ्यांनो तुम्हीही करा असा प्रयोग
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर एकमत झाल्यानंतर त्यासंदर्भात आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे. पुणतांब्याच्या आंदोलनाबरोबरच येथील आंदोलनही सुरु झाले असून आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढील चार दिवसांमध्ये आंदोलन अधिक तीव्र केले जाणार आहे. शेतकऱ्यांमध्ये सरकार विरुद्ध प्रचंड आक्रमकता दिसून येत आहे. अनेक शेतकरी सध्या राज्यात आत्महत्या करत आहे.
महत्वाच्या बातम्या;
शर्यतीसाठी लांडगे यांनी मला हा खास ड्रेस शिवून दिल्याबद्दल दादा तुमचे आभार
मोदी सरकारची 10 लाखांची घोषणा! आता मिळणार हमीशिवाय 10 लाखांचे कर्ज, असा करा अर्ज...
घर बांधायचे असेल तर करा घाई! लोखंड झालंय खूपच स्वस्त...
Share your comments