1. बातम्या

स्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना

गडचिरोली: स्थानिक लोकांना आर्थिक पाठबळ उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी जिल्ह्यातील दुग्धव्यवसायाला चालना देणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले. गडचिरोली येथील वडसा शासकीय यलु माता प्रक्षेत्र व बदक पैदास प्रक्षेत्र येथे भेटीवेळी ते उपस्थित अधिकाऱ्यांशी बोलत होते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra


गडचिरोली:
 स्थानिक लोकांना आर्थिक पाठबळ उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी जिल्ह्यातील दुग्धव्यवसायाला चालना देणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले. गडचिरोली येथील वडसा शासकीय यलु माता प्रक्षेत्र व बदक पैदास प्रक्षेत्र येथे भेटीवेळी ते उपस्थित अधिकाऱ्यांशी बोलत होते.

यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. श्री. केदार यांनी संबंधित वळू माता संगोपन व बदक पैदास केंद्राच्या कामांचा आढावा घेतला. ते म्हणाले, वडसा हे राज्यस्तरावरील पशूधन विकास केंद्र म्हणून निर्माण झाले पाहिजे. यातून स्थानिक लोकांना पशूधन व दुग्ध व्यवसायाबाबत चालना मिळून या क्षेत्रात विकास साधण्याची संधी त्यांना उपलब्ध होईल. यावेळी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी वडसा येथील केंद्रात आवश्यक वातावरण व जागा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणले. मग याठिकाणी अजून या केंद्रात सुधारणा करून देशातील सर्वोत्कृष्ट वळू पैदास केंद्र बनविता येईल, एक राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र उभरता येईल असे मत व्यक्त केले. यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची दुभती जनावरे व त्याबाबतची संगोपन प्रक्रिया याच ठिकाणी पाहता येईल. यासाठी तातडीने आराखडा निर्माण करून शासनास सादर करण्याचे निर्देश श्री. केदार यांनी पशूसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना दिले. वडसाला लागून असलेल्या या केंद्रात ४ तलाव, 6 बोरी तसेच बाजूने पाण्याचा कॅनल आहे.

पशूधन प्रकल्पास निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

पालकमंत्र्यांनी यावेळी वळू माता प्रक्षेत्रावर सद्यस्थितीत उच्च व उत्तम दुग्धोत्पादन असलेल्या देशी सहिवाल गायींची संख्या वाढवुन संवर्धन करण्याचे निर्देश दिले. यासाठी शासनाकडून अजिबात निधी कमी पडू देणार नाही असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यानुसार ताबडतोब परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. प्रक्षेत्रावर पशुपालनाविषयी उच्च दर्जाचे प्रशिक्षण केंद्र पुर्व विदर्भ विभागाकरिता विकसित करण्याबाबत आराखडा तयार करण्यासंदर्भात तातडीने काम हाती घ्या असे सांगून वळु माता प्रक्षेत्राकरिता प्रोजेक्ट रिपोर्ट बनवुन त्यानुसार कार्यावाही करण्याबाबतचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

वळू माता प्रक्षेत्रावर संरक्षण भिंत बाधण्याकरीता, बल्क मिल्क कुलर, मिल्कींग मशीन, हारव्हेस्टर चारा कटाई करण्याकरिता, बेलिंग मशीन, फ्रिजवाल गायींच्या शेडमध्ये फॉगर सिस्टीम, जनावरांकरिता नविन अत्याधुनिक शेड बांधणे इत्यादी करीता जि. नि. स. गडचिरोली अंतर्गत प्रस्ताव करण्याबाबत पालकमंत्री महोदयांकडुन निर्देश देण्यात आले.

मंत्री, सुनील केदार यांनी बदक पैदास प्रक्षेत्रावरील पायाभुत बदक कळप क्षमता ३५० वरुन १००० करण्यात यावी अशा सूचना यावेळी केल्या. बदक पैदास प्रक्षेत्रावर महिन्याला ५,००० एकदिवसीय बदक पिल्लांची निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात येउन प्रक्षेत्राची उत्पादन क्षमता वाढविण्यात यावी असे त्यांनी प्रशासनास निर्देशित केले.

English Summary: Promoting dairy business to improve the living standards of the locals Published on: 23 May 2020, 08:50 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters