राज्यातील प्रमुख नद्यांच्या शुद्धीकरणास प्राधान्य

Saturday, 22 December 2018 10:35 AM


पंढरपूर:
राज्यातील गोदावरी, भीमा, पंचागंगा, इंद्रायणीसह प्रमुख नद्यांच्या शुद्धीकरणास पर्यावरण विभागाने प्राधान्य दिले असून, केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.

नमामी चंद्रभागातंर्गत पर्यावरण विभागामार्फत पंढरपूरात करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत पर्यावरण मंत्री कदम यांनी घेतला. यावेळी खासदार अनिल देसाई व विनायक राऊत, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, तहसीलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपवन संरक्षक संजय माळी, मंदीर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री कदम म्हणाले, राज्यातील प्रमुख नद्यांच्या शुद्धीकरणाचा कालबद्ध कार्यक्रम पर्यावरण विभागामार्फत हाती घेण्यात आला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या विविध परवानगी मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.

पंढरपूरच्या विकासासाठी पर्यावरण विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून पंढरपुरातील वारकऱ्यांसाठी शौचालये, स्नानासाठी ओटे, चेजिंग रुम उभारली जावीत. या सुविधा महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र असाव्यात. हे काम मार्चअखेर पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. वारकरी भाविकांच्या दृष्टीने चंद्रभागेला अन्यन्य साधारण महत्त्व आहे. चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्यासाठी व वारकऱ्यांना आवश्यक सेवा देण्यासाठी पर्यारण विभागामार्फत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.

भीमा नदीकाठावरील १२१ गावांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पाणी पुनर्वापरात आणण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन, नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कामे सुरु करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. यासाठी सर्व संबंधितांची लवकरच बैठक घेतली जाईल असेही पर्यावरण मंत्री कदम यांनी सांगितले. तद्नंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. आणि घाटांची व नदीपात्राची पाहणी केली, तसेच पर्यावरण विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांच्या ठिकाणांची पाहणी केली.

गोदावरी भीमा पंचागंगा इंद्रायणी godavari bhima panchganga indrayani Namami Chandrabhaga नमामि चंद्रभागा

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.