1. बातम्या

रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या, दर कमी करण्यासाठी कृषीमंत्र्यांचे केंद्र सरकारला पत्र

रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या,

रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या,

कोरोनाच्या काळात केंद्राने रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे हे वाढवलेले खतांचे दर केंद्र सरकारने कमी करावेत अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी एका पत्राद्वारे केली आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीत 700 ते 800 रुपयांची वाढ केली आहे.

गेल्या दीड वर्षापासून शेतीची कामं जरी सुरु असली तरी बाजारपेठा बंद असल्याने त्याचा फटका बहुतेक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती हालाखीची झाली आहे. ज्या पद्धतीने रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ झाली आहे ती अव्वाच्या सव्वा आहे आणि ती शेतकऱ्याला परवडणारी नाही. बऱ्याच खतांच्या किंमतीत 700 ते 800 रुपयांची वाढ झाली आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता ही दरवाढ तातडीनं मागं घ्यावी अशी विनंती कृषी मंत्री दादा भुसे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यासाठी आपण सातत्याने पाठपूरवठा करु आणि केंद्र सरकारला ही दरवाढ मागे घ्यायला लावू असं कृषीमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : शेतकऱ्यांवर महागाईची मार, डीएपी खताच्या किंमतीत ५८ टक्क्यांनी वाढ, १२०० रुपयांच्या गोणीसाठी द्यावे लागतील १९०० रुपये

दर वाढीच्या निर्णयाने परत शेतकऱ्यांची अडचणी वाढणार आहे.  कारण १२०० रुपयांमध्ये मिळणाऱ्या डीएपी  खातांची गोण आता १९०० रुपयांत मिळणार असल्याने आर्थिक गणित बिघडणार आहे. हवामान विभागाने यंदा पाऊस चांगला होणार असल्याचा अंदाज वर्तवला, त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाची लहरी होती. पण खतांची किंमत वाढू लागल्याने उत्पन्न खर्चात वाढ होणार असल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. जाणकारांच्या मते, रासायनिक खतांचे दर वाढत असल्याने उत्पन्न खर्च अधिक होणार आहे. इंधनाचे दर वाढल्यानंतर आता खतांची किंमती वाढल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.

 

खतांचे वाढलेले नवीन दर काय आहेत?

इफको 10:26:26 चा जुना दर हा 1175 रुपये इतका होता, तो आता 1775 रुपये इतका झाला आहे. इफको 10:32:16 चा जुना दर हा 1190 इतका होता आता तो 1800 रुपये इतका झाला आहे. इफको 20:20:00 चा जुना दर हा 975 रुपये इतका होता तो आता वाढून 1350 रुपये इतका झाला आहे. डीएपी खताचा जुना दर हा 1875 रुपये इतका होता, तो आता 1900 रुपये इतका झाला आहे. आयपीएल डीएपी खताची जुनी किंमत 1200 रुपये होती ती आता 1900 रुपये इतकी झाली आहे. आयपीएल 20:20:00 ची जुनी किंमत ही 975 रुपये इतकी होती, ती आता 1400 रुपये इतकी झाली आहे. पोटॅशच्या एका पोत्याची किंमत आधी 850 रुपये होती, ती आता 1000 रुपये करण्यात आली आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters