राज्यात डिझेल व पेट्रोलच्या राज्यात डिझेल व पेट्रोलच्या किंमतीमध्ये मोठी दरवाढ! जाणून घ्या; 'या' दरवाढी मागची कारणे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे (Ukraine Russia War) जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय. अनेक गोष्टींमध्ये वाढ होतांना दिसत आहे. त्यातच भर म्हणजे इंधनाचे दर देखील वाढणार आहेत. मागील चार महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and diesel) दरात भाववाढ झालेली नव्हती. मात्र पुढील आठवड्यापासून इंधनाच्या दरात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अलीकडेच एलपीजी सिलेंडरचे दर वाढले, सोबतच इंधनाचे दर वाढणार असल्याने नक्कीच सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
इंधन कंपन्या तोटा भरून काढणार
इतकेच नव्हे तर कच्च्या तेलाने दरवाढीमध्ये विक्रमच मोडला. कच्चे तेल (crude oil) प्रति डॉलर 100 रुपयांच्याही पुढे गेले आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागले तरी देखील भारतात इंधनाच्या दरात गेल्या चार महिन्यांपासून कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही.
याचा मोठा फटका हा इंधन कंपन्यांना (Oil Marketing Companies)बसत आहे. त्यामुळे हा झालेला तोटा भरून काढण्यासाठी पुढील आठवड्यात पेट्रोल नऊ रुपयांनी महाग होण्याचा अंदाज आहे.
पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर भाववाढ
पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल पुढील आठवड्यात आहे. या निवडणुकांनंतर पेट्रोल, डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
पाचही राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या दहा मार्चला जाहीर होणार आहेत. आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असतांना सुद्धा भारतात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. मात्र आता निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर येणाऱ्या काळात इंधनात मोठी वाढ पहायला मिळू शकते.
Share your comments