1. बातम्या

प्रशांत डिक्कर यांच्या आक्रमकतेने कृषि क्षेत्रातील रात्रीचा सिंगल फेज सुरु

KJ Maharashtra
KJ Maharashtra
स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर

स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर

संग्रामपूर- गेल्या अनेक दिवसा पासून शेती पंपाचा रात्रीचा बंद असलेला सिंगल फेज विज पुरवठा पूर्वरत चालू करा. या मागणीसाठी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी १ जून रोजी संग्रामपुर येथील सहाय्यक अभियंता यांच्या दालनात ठिय्या देत महावितरणला कृषी क्षेत्रातील रात्रीचा सिंगल फेज सुरू करण्यास भाग पाडले.

सहाय्यक अभियंता यांच्या दालनात अट्टाहास धरल्याने अखेर आज संध्याकाळ पासून कृषी क्षेत्रातील सिंगल फेज सुरू करण्यात येणार असल्याचे सहाय्यक अभियंता नवलकर यांनी लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्रशांत डिक्कर यांच्या मागणीची महावितरणे दखल घेतल्याने तालुक्यातील कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

पुढील आठवड्यात आता खरिपाची पेरणी होऊ घातली आहे, त्या मधे मानसून पूर्व कपाशी,मिरची, आणि अन्य भाजीपाला पिकाची लागवड आपल्या भागात मोठ्या प्रमाणात केली जाते. चांगला पाऊस होण्यासाठी अजुन वेळ आहे.तो पर्यंत कपाशी सह या सर्व पिकांना ओलीताचे पाणी देने अत्यावश्यक आहे, त्या पेक्षाही अतिशय महत्त्वाचे म्हणजे या कपाशी पिकावर हरिणाच्या टोळी चे तूफान आक्रमण असते. या आक्रमनाला थोपविन्यासाठी शेतकऱ्यांना शेती मधे चौवीस तास जागता पहारा द्यावा लागतो.

 

पावसाळी व ढगाळ वातावरण असल्याने आता रात्री गारवा तयार होतो या मुळे रात्री साप, विंचू, यांचे सह अस्वल,कोल्हा लांडगे,वेळ प्रसंगी बिबट्या आदी जणावारांचा मोठा जीव घेना धोका निर्माण होतो. हा धोका कधी कधी शेतकऱ्यांच्या जीवावर सुद्धा बेतु शकतो. त्यामुळे कृषी क्षेत्रातील रात्रीचा सिंगल फेज वीज पुरवठा सुरु केल्याने प्रशांत डिक्कर व सहाय्यक अभियंता नवलकर यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.
प्रतिनिधी- गोपाल उगले

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters