MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

प्रधानमंत्री सन्मान योजनाच अडकली कृषी महसुल विभागाच्या श्रेयवादात

चिखली- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची असंख्य शेतकरी यांना रक्कम मिळाली नाही.तर शेतकरी याबाबत विचारणा करावयास गेल्यास कृषी विभागाकडे जा व योजनेवर बहिष्कार असल्याचे तहसिलकडून सांगितले जात असल्याने शेतकर्यासाठी सन्मान मानल्या जाणार्या योजनेपासुनच शेतकरी वंचीत राहत आहेत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना

चिखली- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची असंख्य शेतकरी यांना रक्कम मिळाली नाही.तर शेतकरी याबाबत विचारणा करावयास गेल्यास कृषी विभागाकडे जा व योजनेवर बहिष्कार असल्याचे तहसिलकडून सांगितले जात असल्याने शेतकर्यासाठी सन्मान मानल्या जाणार्या योजनेपासुनच शेतकरी वंचीत राहत आहेत.

दोन हजार रुपयांच्या अनुदानासाठी शेतकर्याची फरपट होत असल्याने आदेशास न जुमानणार्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी दि१७आॅगस्ट रोजी स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी कृषी आयुक्त तथा पि एम किसान योजना अमलबजावणी प्रमुख धिरज कुमार यांच्याकडे केली आहे.

शासनाकडून शेतकरी हितासाठी पि एम किसान सन्मान योजना सुरु केली आहे.यासाठी ग्राम,तालुका,जिल्हानिहाय समित्या स्थापन करुण जिल्हाधिकारी अध्यक्ष तर उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव म्हणुन नियुक्त करण्यात आले होते.या योजनेसाठी लाभार्थी निवड व माहिती संकलन व फिडींग करणे हि जबाबदारी तहसिल विभागाची होती.असे असतांनाही काहिंना योजनेचा लाभ मिळाला तर असंख्य शेतकरी आजहि योजनेपासुन वंचित राहले आहेत.सदर योजनेसाठी माहिती संकलीत करणे हि जबाबदारी संबंधीत तलाठी यांची होती.तर ग्रामसेवक,कृषी सहाय्यक यांसाठी सहकार्य करतील असे शासन आदेशात नमुद देखील आहे.

या योजनेपासुन असंख्य शेतकरी वंचीत असतांना काहि महिण्यापुर्वी कृषी विभागास या योजनेत उत्कृष्ट कामकाज केल्याने पुरस्कार देण्यात आला असल्याने तेव्हा पासुन कृषी व महसुल विभाग असा हा वाद पेटला आहे.यामुळेच या योजनेत व कार्य पध्दतीत कसलेही बदल करु नये,असे आदेश देखील १/०४/२०२१रोजी कृषी आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते.परंतु तरीसुद्धा तहसिल विभागाकडुन शेतकर्याना कृषी विभागाकडे जाण्याचा सल्ला दिला जात आहे.तर कृषी विभाग मात्र आमचा आणि योजनेचा संबंध नसल्याचे सांगत असल्याने शेतकर्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हा श्रेयवाद थांबवुन शेतकर्याची हेळसांड थांबवावी यासह गाव,नाव,आधार क्र व अकाउंट नंबर चुकले आहेत त्यामधे सुधारणा करावी,शेतकर्यास योजनेपासुन वंचीत ठेवणार्या दोषींवर कारवाई करावी अशी मागणी १२एप्रिल रोजी तहसिलदार,जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती.

 

परंतु महिने उलटुनही बहिष्कार जैसे थे असल्याने मागण्यांच्या अनुषंघाने कारवाई झाली नसल्याने व मागील आठवड्यातील पि एम किसान योजनेचा हप्ता देखील श्रेय वादमुळे मिळाला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात पुणे कृषी आयुक्तालय गाठुन कृषी आयुक्त तथा पीएम किसान योजनेचे अमलबजावणी प्रमुख धिरज कुमार यांची भेट घेऊन पि एम किसान योजनेस अडचणीच्या मुद्दानवर सविस्तर चर्चा केली आहे.दरम्यान कृषी आयुक्त यांच्या आदेशास न जुमानल्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी.

हेही वाचा : बापरे! 27 लाख शेतकऱ्यांचे अडकले पैसे; पीएम किसान योजनेत करू नका 'या' चुका

शेतकर्याना सन्मान योजने पासून वंचित ठेवणार्या माहिती संकलन व फिडींग करणार्याची चौकशी करुण दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी,पीएम किसान योजनेपासुन वंचीत असलेल्यांचा समावेश योजनेत करण्यात यावा,योजनेचे हप्ते प्राप्त न झालेल्यांच्या खात्यावर थकीत रक्कम जमा करावी,यासह आदि मागण्या लेखी निवेदनाव्दारे करण्यात आल्या असुन आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा सरनाईक यांनी दिला आहे.यावेळी माजी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर,विदर्भध्यक्ष दामुअन्ना इंगोले,विकास देशमुख,यांच्यासह प्रमुख शेतकरी व कार्यकर्ते उपस्थीत होते

 

शेतकर्याना वेठीस धरु नये,तुपकरांनी कृषी आयुक्तांसमोर व्यक्त केला संताप..

पुरस्कारामुळे कृषी व महसुल विभाग यांच्यामधे वाद सुरु आहे.तहसिल विभागाकडुन सन्मान योजनेच्या कामावर बहिष्कार असल्याचे सांगीतले जात असल्याने.हि बाब आत्म चिंतनाची असुन यामुळे शेतकर्याची हेळसांड होत आहे.योजनेचे हप्ते देखील अनेकांना मिळाले नसल्याने सन्मान योजनेत शेतकर्याचा होणारा अपमान सहण केला जाणार नाही. असे सुनवत तुपकरांनी कृषी आयुक्त यांच्या समोर संताप व्यक्त केला.दरम्याण यावर तोडगा काढु असे अश्वासन आयुक्तांनी दिले आहे.

प्रतिनिधी गोपाल उगले.

English Summary: Pradhan Mantri Sanman Yojana is stuck in the credit of the Agriculture Revenue Department Published on: 27 August 2021, 11:10 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters