विजेच्या तारांवर आकडे टाकून घरगुती वीज चोरी करण्याच्या घटना बऱ्याचदा घडल्या आहेत. आता मात्र चक्क कृषिपंपासाठी वीज चोरी करण्यात आली. लाखांदूर तालुक्यातील विरली मंडलात उच्चदाब वाहिनीवर आकडे टाकून वीज चोरी केल्याची घटना समोर आली आहे . या प्रकारानंतर संबंधित शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सहा शेतकऱ्यांना ३६ हजार १२० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच वेळेत दंड भरला गेला नाही तर फौजदारी कारवाई देखील केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून लाखांदूर तालुक्यात विविध क्षेत्रात कृषिपंपाना विजेचा पाठपुरावा केला जातो. या क्षेत्रातील सात हजार अधिकृत कृषिपंपाना वीज पुरवली जाते. यात विरली मंडलातील काही शेतकऱ्यांनी कृषीपंपासाठी वीज चोरी केल्याची बाब शोध मोहिमेद्वारे पुढे आली.
कंपनीच्या अधिकाऱ्यांना वीज चोरी जात असल्याची शंका निर्माण झाली त्यातून त्यांनी मंगळवारी शोध मोहीम राबवली. त्यावेळी विरली मंडलांतर्गत सहा शेतकऱ्यांची नावे समोर आली. त्यांनी उच्चदाब वाहिनीवर आकडे टाकून वीज चोरी केल्याचे कृत्य या शोधमोहिमेतूम उघडकीस आले.
वीज चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वायरसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच त्यांच्यावर ३६ हजार १२० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. दंड वेळेत न भरल्यास फौजदारी कारवाई केली जाणार. अशी माहिती वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या;
Online Cow Dung Bussiness: गायीच्या शेना पासून बनणाऱ्या गोवऱ्या तुम्हाला बनवू शकतात लखपती
अतिशय महत्वाची माहिती! गोबर गॅस प्लांट कसा उभारायचा? याबद्दल घ्या सविस्तर माहिती
मानलं लेका तुला….!! 12वी पास झाला अन शेती करायचं ठरवलं; आज वर्षाकाठी लाखों छापतोया
Share your comments