नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर हे एक फोटो कल्चर सेंटर असल्याने नाशिक जिल्ह्यांमधून कमीत कमी एक लाख कोटी रुपयांची कृषी निर्यात शक्य आहे.
त्यासोबतच येणार्या भविष्यकाळात महाराष्ट्रात ड्रायपोर्ट तयार करण्यात येणार असल्यामुळे शेतमाल याचा खर्च देखील वाचणार आहे आणि त्यासोबतच बांगलादेशमध्ये शेतमाल निर्यातकेला जाईल असा विश्वास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केला. नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे देण्यात येणारा पहिलास्व. माधवराव लिमये स्मुर्ती कार्यक्षम संसद सदस्य पुरस्कार गडकरी यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गुरुवारी प्रदान करण्यात आला.
यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार,खासदार सुभाष भामरे,हेमंत गोडसे,रक्षा खडसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले की नाशिक सारख्या सांस्कृतिक नगरीचीचळवळ सार्वजनिक वाचनालयाने अखंडपणे चालविले आहे. कृषी क्षेत्रातले कौशल्य, तंत्रज्ञान व ज्ञान हे महाराष्ट्रात नाशिक मधून फैलावते. डॉ. भारती पवार व खासदार हेमंत गोडसे यांनी अभ्यास करून एक पुरस्कार सुरू करावा.
सर्वाधिक द्राक्ष व कांदा निर्यात असणाऱ्या नाशिक विभागातील पंचविश शेतकऱ्यांचा नागरी सत्कार करावा. यावेळी निवड समितीचे अध्यक्ष या नात्याने खा. हेमंत गोडसे म्हणाले की गडकरी यांनी महाराष्ट्रात बांधकाम मंत्री असताना उल्लेखनिय कार्य केले. आजही त्यांच्या कामाचे दाखले दिले जातात. त्यांनी देशाच्या विकासाला दिशा देण्याचे काम केले आहे म्हणून त्यांचे नाव प्राधान्याने समितीने घेतले.
Share your comments