मुंबई: काजू उद्योगाला व्हॅटचा परतावा देण्याबाबत तसेच काजूपासून तयार होणाऱ्या फेणीला करसवलत देण्याबाबत राज्यशासन सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र काजू उत्पादक संघटनेच्या प्रतिनिधींना दिला.
संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींनी आज उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी कोकणातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपण नेहमीच सकारात्मक राहिलो असून काजू उत्पादक शेतकरी हे कोकणच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना आपले नेहमीच सहकार्य राहिल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.