1. बातम्या

अखेर काळजावर दगड ठेवत शेतकऱ्याने मारला उसावर रोटावेटर, ऊस तोडायला ४५ हजारांची मागणी

राज्यात अनेकांचे ऊस अजूनही शिल्लक आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या मे महिना संपला पावसाळा सुरु झाला तरी अनेकांचे ऊस फडातच आहेत. यामुळे आता करायचे तरी काय असा प्रश्न अनेकांच्या पुढे आहे. जालना जिल्ह्यात देखील अजूनही अनेकांचे ऊस शेतातच आहेत.

farmer killed rotavator sugarcane placing stone

farmer killed rotavator sugarcane placing stone

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांचे ऊस अजूनही शिल्लक आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या मे महिना संपला पावसाळा सुरु झाला तरी अनेकांचे ऊस फडातच आहेत. यामुळे आता करायचे तरी काय असा प्रश्न अनेकांच्या पुढे आहे. जालना जिल्ह्यात देखील अजूनही अनेकांचे ऊस शेतातच आहेत. यामुळे येथील ऊस उत्पादक शेतकरी टोकाचा निर्णय घेत आहेत. याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

कारखान्याकडे नोंद करुनही ऊसाची तोड न झाल्याने जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील शेतकऱ्यांने दोन एकरावरील ऊसावर रोटावेटर फिरवला आहे. अनेक वेळा (Sugar Factory) साखर कारखान्याकडे चकरा मारुनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने दाजीबा राऊत यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. यामुळे त्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. यामुळे त्यांच्यापुढे मोठे आर्थिक संकट समोर आले आहे.

कारखान्याची तर तोड नाहीच पण तोडीसाठी 45 हजाराची मागणी केल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. इतका खर्च करून तोडीसाठी देखील पैसे द्यायचे म्हणजे पूर्णपणे शेतकऱ्यांचे नुकसान आहे. यामुळे आता शेतकऱ्यांपुढे पर्याय नाही. त्यांच्या उसाची नोंद छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग या कारखान्याकडे होती.

घरात बसुन बांधावरची परिस्थिती कळेल का? जलजीवन मिशनबाबत धक्कादायक वास्तव आले समोर

सध्या राज्यात सर्वाधिक अतिरिक्त ऊस हा जालना जिल्ह्यात असल्याचा अहवाल साखर आयुक्त कार्यालयानेच सादर केला होता. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयत्न पुरता फसला आहे. कारखान्याने त्यांच्याकडे लक्ष न दिल्याने राऊत यांनी मालक तोड करुन का होईना ऊस साखर कारखान्याला नेण्यासाठी प्रयत्न केले. पण यासाठी दोन एकरातील ऊस तोडण्यासाठी त्यांच्याकडे 45 हजाराची मागणी झाली. यामुळे त्यांनी रोटावेटर मारण्याचा निर्णय घेतला आहे.

मान्सूनच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना; भांडवल खर्चात होणार वाढ

दरम्यान, मराठवाड्यात कधी नव्हे ते शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पन्न वाढीसाठी ऊसाची लागवड केली होती. तसेच पाण्याची उपलब्धता यामुळे ऊस बहरलाही. मराठवाड्यासारख्या माळरानावरचा भाग हिरवागार दिसला पण उत्पन्नाच्या दृष्टीने त्याचा अधिकचा फायदा झाला नाही. यामुळे आता पुन्हा ऊस लावायचा नाही, असा सूर शेतकऱ्यांमधून आहे. शेतकऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. 
English Summary: farmer killed rotavator sugarcane placing stone Published on: 31 May 2022, 10:36 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters