देशात अमली पदार्थांचे विक्री तसेच उत्पादन करणे कायद्याने प्रतिबंधित करण्यात आले आहे. असे असले तरी देशातील तसेच राज्यातील अनेक शेतकरी काही पैशांच्या हव्यासापोटी गांजा अफू यांसारख्या अम्लीय वनस्पतींची सर्रासपणे लागवड करताना दिसत आहेत. काल-परवाच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात गांजाच्या शेतीचे प्रकरण उघडकीस आले होते.
आता पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात अम्लीय वनस्पतींची लागवड आढळली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात मौजे ठेपणपाडा येथे अफूची शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबत दिंडोरी पोलिसांनी धडक कारवाई करत आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना तुरुंगवासात कोंबले आहे.
दिंडोरी पोलिसांना त्यांच्या गुप्त सूत्रांनी मौजे ठेपणपाडा येथे अफूची शेती केली जात असल्याचा सुगावा दिला होता त्या पार्श्वभूमीवर दिंडोरी पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत सूत्रांनी सांगितलेल्या ठिकाणी धाव घेतली. रविवारी सकाळी दिंडोरी पोलिसांनी ही कारवाई केली, छापेमारीत पोलिसांना विनापरवाना बेकायदेशीरपणे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी अफूची शेती फुलवली असल्याचे उघड झाले. पोलिसांनी याबाबत कारवाई करत घटनास्थळाहून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांणी 43 गोणी अफूच्या यावेळी ताब्यात घेतल्या, पोलिसांच्या मते, सुमारे आठ लाख रुपये किमतीचा अफु ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी कारवाई करत शेतकरी रामचंद्र गोविंद ठेपणे व दीपक लालसिंग महाले यांच्यावर वेगवेगळ्या कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. याबाबत दिंडोरी पोलीस सखोल चौकशी देखील करत आहेत.
Share your comments