सध्या महाराष्ट्रात शेतकरी राजा मोठ्या संकटाणा सामोरे जात आहे. आसमानी आणि सुलतानी संकटाणा तोंड देत बळीराजा कसातरी स्वतःला सावरत आहे, पण अशातच आता भुरट्या चोरांनी थैमान घालायला सुरवात केली आहे. पंढपूर तालुक्यात भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले आहे, आणि आता ह्या भुरट्यानी चक्क शेतमाल लंपास करायला सुरवात केली आहे.
त्यामुळे पंढपूर तालुक्यातील शेतकरी व नागरिक भीतीच्या वातावरणात जगत आहेत. तालुक्यातील रांजणी या गावातील एका डाळिंब उत्पादक शेतकऱ्याच्या बागेतून चोर चोरी करतांना रेड हॅन्ड पकडला गेला. पंढरपूर शहरात चोरांचे चोरीची मालिका सुरु होती परंतु पंढरपूर ग्रामीण त्यापासून आतापर्यंत वाचले होते, पण हि चोरीची घटना समोर आली आणि ग्रामीण भागात याच्या चर्चेला उधाण आले. आता ग्रामीण भागातील नागरिक देखील यामुळे हवालदिल झाल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. सध्या डाळिंब पिकाला विक्रमी भाव मिळत आहे, म्हणुन भुरटे चोर तालुक्यात ऍक्टिव्ह झाल्याचे समजत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना सावधानता बाळगण्याचे सांगितले जात आहे
रांजणी गावातील डाळिंब उत्पादक शेतकरी बालाजी ढेकळे यांच्या बागेत हि चोरीची घटना घडली आहे. बालाजी यांचे डाळिंब काढणीसाठी तयार आहे, आणि परिसरात चोरांचा शिरकाव असल्याची बातमी त्यांच्या कानावर पडलेली होती त्यामुळे ते शेतराखण करण्यासाठी शेतात जात. मंगळवारी सायंकाळी सातच्या दरम्यान बालाजी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गस्त घालायला गेले, आपल्या बागेतून गस्त घालत असतांना त्यांना शेतात चोरांचा आभास झाला, जेव्हा त्यांनी बागेत व्यवस्थित निरीक्षण केले तेव्हा त्यांना लहू कांबळे हा व्यक्ती डाळिंब पोत्यात टाकताना दिसला.
बालाजी यांनी आरोपीला डाळिंबासह रंगेहात पकडले. आरोपीकडून जवळपास सोळा हजार रुपयाचे डाळिंब पकडण्यात आले, आरोपीवर गुन्हा दाखल करून पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत. वाढत्या चोरिंमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गस्त घालावी असा सल्ला दिला जात आहे.
Share your comments