आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कांदा व्यापार म्हटलं की तोंडात पाहिलं नाव येत ते लासलगाव. लासलगाव हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे कांदा आयात निर्यात चे सर्वात मोठी बाजारपेठ आहे.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये डाळिंब लिलावाचा शुभारंभ केला आहे. हा लिलावाचा समारंभ सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते केला होता. या लिलावात डाळिंबाचे 600 कॅरेट चा समावेश केला होता.
1800 ते 2000 रुपये भाव मिळाला:
या लिलावात डाळिंबाच्या एका कॅरेट ला म्हणजेच 20 किलो ला 5200 रुपये एवढा भाव मिळाला. बाकीच्या राहिलेल्या कॅरेट ला 1800 ते 2000 रुपये एवढा भाव मिळाला आहे.तसेच लासलगाव कृषी उत्पन्न समिती आणि आजूबाजुूला असणारे निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगांव, सिन्नर, कोपरगांव, राहुरी, राहाता व नेवासा या तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड होते. तसेच सर्वात जास्त डाळिंब उत्पादक शेतकरी सुद्धा याच तालुक्यात आहे. त्यासाठी येथील शेतकऱ्यांना डाळिंब विक्री जवळच्या भागात व्हावी त्यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ने 2014 सालापासून डाळिंबाचा निलाव सुरू केला होता.
हेही वाचा:माझं मत - कर्जमाफी नका देऊ, पण फक्त हस्तक्षेप थांबवा
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधून दररोज देशा मधील दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, बिहारसह या वेगवेगळ्या राज्यात मोठ्या प्रमाणत डाळिंब जात आहेत. त्यामुळे चालू हंगामातील म्हणजेच जून जुलै महिन्यात सुरू झालेल्या डाळिंबाच्या लिलावाला सुरवात झाली आहे. तसेच येणाऱ्या डाळिंबाला योग्य भाव मिळेल असे ही कृषी उत्पन्न समितीने सांगितले आहे.त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. येथील शेतकरी वर्गाला जवळ बाजारपेठ मिळाल्या मुळे येथील शेतकरी आनंदी आहे कारण यामुळं डाळिंब फळा मागचा खर्च हा कमी झाला आहे म्हणजेच वाहतूक वगैरे इत्यादी.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांदा पिकाला योग्य आणि चांगला भाव मिळतो सोबतच डाळिंबाला सुद्धा चांगला भाव मिळतोय. त्यामुळं येथील शेतकरी खूप सुखी आहे.गोरख बुल्हे या शेतकऱ्यांनी सांगितले सुद्धा की आज या मार्केट कमिटी मध्ये माझ्या डाळिंबाला चांगला भाव मिळाला आहे. या मध्ये मला प्रति 20 किलो म्हणजेच 1 कॅरेट ला 5200 एवढा भाव मिळाला आहे त्यामुळं मी खूप खुश आहे असे त्याने स्वतः म्हटले आहे.
Share your comments