गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक तरुण शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस आणि शेडनेटमध्ये शेती केली. असे असताना काहींनी यामधून चांगले पैसे कमवले. यानंतर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस आणि शेडनेटमध्ये शेती केली.
असे असताना मात्र नंतरच्या काळात यामध्ये अनेक शेतकरी देशोधडीला लागले. दुप्पट उत्पन्न सबसिडीचे प्रलाेभन दाखवून शेतकऱ्यांच्या माथी मारलेल्या या याेजनेने विदर्भातील शेकडाे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
यामुळे अनेकांवर मोठे संकट आले आहे. या याेजनेत लाभ हाेण्याऐवजी शेतकऱ्यांच्या डाेक्यावर बॅंकांच्या कर्जाचा डाेंगर चढला असून, ते भरण्यासाठी त्यांच्यावर घरदार, शेती विकण्याची पाळी आली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत.
महाराष्ट्रात टाटा पॉवर उभारणार 150 मेगा मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प...
तसेच काही शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यासारखे टाेकाचे पाऊल उचलले आहे. अनेकांवर यामुळे 50 लाखांपर्यंत कर्ज झाले आहे. शासनाने याेजना देतेवेळी कर्जावर ५० टक्के सबसिडी मिळण्याचे सांगितले हाेते.
असे असताना मात्र प्रत्यक्षात सबसिडी मिळाली केवळ २० ते २५ टक्के. ती मिळायलाही अडीच वर्षांचा काळ लाेटला व ताेपर्यंत मूळ कर्जावर व्याजावर व्याज चढले हाेते. यामुळे अनेक शेतकरी यामध्ये तोट्यात गेले.
'शेती फायदेशीर करण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न सुरु'
वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत यामुळे 10 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. कोणी १० गुंठ्यांसाठी १२ लाख, कुणी २०, ३०, ५० लाखांपर्यंत कर्ज घेतले आहे. यामुळे अनेक शेतकरी तोट्यात गेले आहेत. यामुळे अनेकांनी जमिनी देखील विकल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आता शेतकऱ्यांना कमी किमतीत मिळणार खत
शेतकऱ्यांची वीज पुन्हा तोडण्यास सुरुवात, पिके लागली जळू
शेतकऱ्यांनो शेळीपालन व्यवसायात दूध उत्पादन करून कमवा लाखो रुपये, वाचा सविस्तर..
Share your comments