1. बातम्या

जैन हिल्सवरील पोळा पारंपरिक पद्धतीने साजरा

KJ Staff
KJ Staff
पोळानिमित्त भेटवस्तू देऊन सालदारांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करताना अन्मय जैन, ज्योती जैन, डॉ.भावना जैन.

पोळानिमित्त भेटवस्तू देऊन सालदारांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करताना अन्मय जैन, ज्योती जैन, डॉ.भावना जैन.


जळगाव:
शेतकऱ्यांच्या हितासांठी झटणाऱ्या जैन इरिगेशन तर्फे दरवर्षाप्रमाणे यावर्षीही बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण उत्साहाने साजरा करण्यात आला. यात विदेशातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरावर त्यांनीही फेर धरला. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते बैलाचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी जैन परिवारातर्फे कृषी विभागातील सालदार व त्यांच्या परिवारांचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

जैन हिल्स परिसरात झालेल्या पोळ्याच्या सोहळ्यावेळी सप्तधान्यासह बैल जोड्यांचे विधीवत पुजन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन यांच्याहस्ते करण्यात आले. शोभना जैन, डॉ. भावना जैन, अन्मय जैन, जैन फार्मफ्रेशचे कार्यकारी संचालक सुनील देशपांडे, डॉ. डी. एन. कुलकर्णी, गीता धरमपाल, डॉ. अनिल ढाके, पी. एस. नाईक, गौतम देसर्डा, डॉ. बी. के., शेती विभागाचे संजय सोनजे, भास्कर कोळी, विजयसिंग पाटील, जी. आर. पाटील, जयंत सरोदे, एस. बी. ठाकरे, रवि कमोद, संजय पाटील यांच्यासह कृषी विभागातील सहकारी उपस्थित होते. यावेळी जैन परिवारातील सदस्यांनी बैलांना पूरणपोळीचा नैवेद्य भरविला. पोळ्याच्या सोहळ्यात कृषी विभागातील सालदारांसह शेतकऱ्यांनी सर्जा-राजासह भाग घेतला. पोळ्याचे मानाचे नारळ अमोल पारधी याने मिळविले.

विदेशी पाहूण्यांनी धरला ठेका

पोळा म्हणजे बळिराजाने सर्जा-राजाप्रती व्यक्त केलेला कृतज्ञता सोहळा. या सोहळ्यात भारतीय संस्कृती आणि परंपरा अनुभवायला मिळाली. बैलपोळ्याची ही संस्कृती विदेशी पाहुण्यांनी अनुभवली. ढोल ताशाच्या तालावर त्यांचेही पावले थिरकली. संबळ, पावरीवाद्यावर शेतकरी व सालदारांसह त्यांनीही ठेका धरला. पोळ्याच्या श्रवणीय संगिताने जैन हिल्स परिसरात आनंदी आणि उत्साहाचे वातावरण होते.

ढोल ताशांच्या गरजात निघाली भव्य मिरवणूक

जैन हिल्सच्या पायथ्याशी बैलांची सजावट करण्यात आली. तेथून भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या समाधीस्थळी मिरवणूकीने प्रदक्षणा घातली. त्यानंतर मारोती मंदीरावर दर्शन घेतले. श्रद्धाधाम, कृष्णमूर्तीपासून मिरवणूक गुरूकूल येथे पोळ्याच्यास्थळी आली. बैलजोड्यांच्या मिरवणूकी अग्रस्थानी सालदारांना घोड्यांवर बसविले होते. रंग बिरंगी झुलसह सजावट केलेल्या बैलजोड्या ऐटीत मिरवणुकीत चालत होत्या.

सालदारांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार

जैन हिल्सच्या कृषी विभागातील 52 सालदारांचा परिवारासह जैन परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. यामध्ये रूमाल, टोपी, नारळ, साडी, कपडे व मुलांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. जैन परिवारातील ज्योती जैन, डॉ. भावना जैन, अन्मय जैन यांच्याहस्ते सालदार परिवारांना साहित्य देण्यात आले. अन्मय जैन यांनी पावसाबद्दल कविता म्हटली. बडी हांडा हॉलमध्ये झालेल्या या सोहळ्याप्रसंगी डॉ. डी. एन. कुलकर्णी, डॉ. बी. के., डॉ. अनिल ढाके, विजयसिंग पाटील, संजय सोनजे, एस. बी. ठाकरे, रवि कमोद, जयंत सरोदे उपस्थित होते. प्रकाश पानगडे, लक्ष्मण देशमूख, पी. डी. खोडे, संजय पाटील, एस. डी. पाटील, ज्ञानेश्वर सोंन्ने, प्रशांत चौधरी, मंगेश निकम, किशोर चव्हाण यांनी सहकार्य केले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. तर अन्मय जैन यांनी परिवाराच्यावतीने शेतकऱ्यांचे, सालदारांचे आभार मानले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters