मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना सुरु केली. (PM Kisan Scheme 2022) असे असताना यामध्ये अनेक बदल होत आहेत. आता तुम्हीही 11व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 11व्या हप्त्याचे पैसे सरकार होळीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. यामध्ये मात्र आता काहीसा बदल करण्यात आला आहे.
जर तुम्हालाही हे पैसे हवे असतील तर तुम्ही त्यापूर्वी 31 मार्चपर्यंत महत्त्वाचे काम करा. अन्यथा पैसे मिळणार नाहीत. केंद्र सरकारने प्रत्येकासाठी ई-केवायसी आवश्यक केले आहे. जर तुम्ही हे केवायसी केले नाही तर, 11व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत. अनेकांनी चुकीच्या पद्धतीने पैसे मिळवले आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
ई-केवायसी शिवाय तुमचा 11 वा हप्ता पूर्ण होणार नाही. हे केवायसी तुम्ही घरी बसून ऑनलाइन देखील करू शकता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. यासाठी तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल. तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्यात ekyc चा पर्याय दिसेल. तुम्हाला या eKYC वर क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला इमेज कोड टाकावा लागेल आणि submit बटणावर क्लिक करावे लागेल. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि OTP भरावा लागेल. यानंतर, तुमचे सर्व तपशील पूर्णपणे वैध असल्यास, तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण होईल. जर तुमची प्रक्रिया बरोबर नसेल तर invalid असे लिहिले जाईल. तुम्ही आधार सेवा केंद्राला भेट देऊन हे दुरुस्त करू शकता. यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या;
अतिरिक्त उसाचे अनेकांनी केले सोने, कारखान्यावर चकरा न मारता कमवले लाखो, जाणून घ्या कसे...
ठाकरे सरकारने अखेर निर्णय घेतलाच!! शेतकऱ्यांना कोर्टकचेरीतून मोठा दिलासा..
Share your comments