1. बातम्या

प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत 8.89 कोटी शेतकरी कुटुंबांना 17,793 कोटी रुपयांची मदत

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांसाठी आणि शेतीकामासाठी भारत सरकारचा कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग अनेक उपाययोजना करीत आहे. अद्ययावत माहिती पुढीलप्रमाणे 24.3.2020 पासून आजपर्यंतच्या लॉकडाऊन कालावधीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत सुमारे 8.89 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळाला असून यासाठी आत्तापर्यंत 17,793 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या सध्याच्या परिस्थितीत अन्न सुरक्षा देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत (पीएम-जीकेवाय) पात्र कुटुंबांना डाळींचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत सुमारे 107,077.85 मेट्रिक टन डाळ वाटपासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंदमान आणि निकोबारआंध्रप्रदेशचंदीगडछत्तीसगडदमण आणि दीवगोवागुजरात या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी लाभार्थ्यांना डाळींचे वितरण सुरू केले आहे. मध्यप्रदेशपंजाबराजस्थानतेलंगणापश्चिम बंगालउत्तरप्रदेश आणि दिल्लीसारख्या इतर राज्यांना आंशिक साठा मिळाला आहे आणि त्यांच्या नियोजनानुसार लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने वितरण केले जाईल. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत डाळींच्या वितरणामुळे 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील  सुमारे 19.50 कोटी घरांना लाभ मिळणार आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters