1. बातम्या

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील गळती थांबणार; फक्त पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभ

KJ Staff
KJ Staff


पुणे  : शेतकऱ्यांना शेतीचा खर्च करता परवडावा यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेली पंतप्रधान शेतकरी  सन्मान योजना लवकर अधिक पारदर्शक होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालय त्यांच्याकडील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी लवकरच केंद्रीय कर  विभागाला सादर करणार आहे. त्यामुळे जे श्रीमंत शेतकरी किंवा इतर व्यवसाय करणारे स्वताला शेतकरी म्हणून दाखवत आहेत त्यांना  चाप बसणार आहे.  यामुळे केवळ गरजू शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

शेतकऱ्यांना शेतीतील खर्च निघावा,  शेतकऱ्याच्या हातात पैसा राहावा म्हणून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत  थेट शेतकऱ्याच्या खात्यावर दरवर्षी  ६००० रुपये जमा होतात. पुढील महिन्यात या योजनेचा हप्ता येणार आहे. तत्पुर्वी सरकारने या योजनेविषयी एक मोठा निर्णय घेतला असून यातून  या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना चाप बसणार आहे. जे लोक लोक इतर उद्योगात आहेत परंतु शेतकरी व्यवसाय करत असल्याचा भासवत आहेत. याशिवाय जे शेतकरी  प्राप्तिकर भरतात अशा  लोकांना चाप लावायचा निर्णय सरकारने घेतला आहे.  त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्र्यालयाकडून मिळालेल्या माहितीची कर विभाग पडताळणी करेल.  त्यामध्ये अशा व्यक्ती आढळल्या तर त्यांना या योजनेतून न वगळण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून कळते.

त्यामुळे शेतकऱयांसाठी  महत्वाच्या असणाऱ्या योजनेत पारदर्शकता येईल. ज्या शेतकऱ्यांना खरोखरच मदतीची गरज आहे अशा लोकांना तिचा लाभ मिळेल. यातून गळती कमी होऊन सरकारचे पैसे वाचतील.  दरम्यान जर आपल्या अर्जात काही चुका असतील तर  पुढील महिन्यात येणारे पैसे आपल्या खात्यात येणार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांनी अर्जात असलेल्या चुका दुरुस्त करु घ्याव्यात. 

अशा पद्धतीने दुरुस्त करा आपल्या चुका

PM-Kisan Scheme च्या अधिकृत संकेतस्थळ (https://pmkisan.gov.in/) यावर जा. येथे  फार्मर कॉर्नरच्या आत जाऊन Edit Aadhaar Details या पर्ययावर क्लिक करा. येथे आपला आधार नंबर नोंदवा. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून सबमिट करा.  आता जर आपले नाव चुकीचे असेल तर ते ठीक करा. जर अजून काही दुसरी चुकी असेल तर आपण कृषी विभगाशी संपर्क करावा.  जर यानंतरही आपल्या खात्यात पैसे आले नाही तर आपण केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या हेल्पलाईन (PM-Kisan Helpline 155261 किंवा 1800115526  या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा आणि आपली तक्रार नोंदवा.  या नंबर आपली तक्रार ऐकली गेली नसेल तर आपण मंत्रालयाच्या (011-23381092) नंबरवर संपर्क साधावा.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters