1. बातम्या

अनुदानापासून वंचित तूर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी माहिती सादर करावी

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
खरीप हंगाम 2017-18 मध्ये तूर हरभऱ्याची हमीभावाने विक्री करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने एनसीडीईएक्स ई-मार्केट लि. या पोर्टलवर नोंदणी झालेल्या मात्र नाफेडने खरेदी न केलेल्या तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शेतकऱ्यांनी अनुदानासाठी राज्य सहकारी पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघाकडे अर्ज केले आहेत. मात्र काही शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास लिंक नसणे, आधार क्रमांक चुकीचा असणे यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी आपली आवश्यक सर्व माहिती संबंधित जिल्हा पणन अधिकारी किंवा संबंधित खरेदी-विक्री संघाकडे सादर करावी, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

मंत्रालयात तूर, हरभरा अनुदानाबाबत सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. त्यावेळी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ, मार्केट फेडरेशनचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.यामध्ये तूर उत्पादकांपैकी 1 लाख 30 हजार शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. यातल्या 99 हजार 343 शेतकऱ्यांना 112 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

मात्र अनुदान न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांपैकी अनेकांचे आधार क्रमांकाशी बँक खाते जोडले गेलेले नाही. तसेच काहींच्या आधार क्रमांकात चुका आढळल्याने अनुदान वितरण करण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याचे लक्षात आले आहे. या अडचणी तत्काळ दूर करुन अनुदान लवकरच वितरित केले जाईलअसे आश्वासन सहकार मंत्री श्री. देशमुख यांनी दिले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters