शेतकऱ्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. असे असताना अनेकदा आपण बघतो, की कशी कशाला बाजारभाव मिळेल आणि कशाला नाही याची कोणाला माहिती नसते. असे असताना आता तब्ब्ल सात वर्षांनी रेशीम कोस उत्पादक शेतकरी मालामाल झाले आहेत. यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शेतकरी 'रेशीम' शेतीकडे वळले आणि कोरोनात लागलेल्या लॉकडाउनमुळे भाव अत्यंत उतरले. यामुळे अनेकांनी हा व्यवसाय देखील बंद केला.
त्यामुळे काही वर्ष रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच मोठ आर्थिक नुकसान झाल. यामध्ये काही शेतकऱ्यांनी मात्र पदरचे पैसे घालवून हा व्यवसाय चालू ठेवला. कधी ना कधी आपल्याला चार पैसे मिळतील म्हणून शेतकऱ्यांनी पैसे घालवले आणि आज त्यांना चांगले दिवस आले आहेत. तब्बल 7 वर्षांनी रेशीम कोसचे भाव वाढल्याने शेतकरी मालामाल झाले आहेत.
सध्या रेशीम कोस 800 ते 900 रुपये प्रति किलो मिळत असल्याने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. यासाठी मोठ्या बाजारपेठा म्हणून ओळख असलेल्या जालना, कर्नाटक आदी ठिकाणी 800 ते 900 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. कोसची प्रतवारी चांगली असेल तर 920 ते 950 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे काहींनी हा व्यवसाय तोट्यात करून आज ते चांगले पैसे कमावत आहेत.
कोरोना काळात अनेकांना मोठा फटका बसला. कोरोना काळात शेतकऱ्यांनी जोपासलेल्या या रेशीम कोसचे भाव हे 150 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले होते. आता मात्र हेच दर वाढल्याने अनेक शेतकरी पुन्हा याकडे वळू लागले आहेत. राज्यात मागच्या काही वर्षात रेशीम शेती वाढली आहे. अनेकदा हा व्यवसाय चांगले पैसे मिळवून देतो. परभणी जिल्ह्यात तब्बल 200 ते 250 हेक्टरवर शेती केली जाते.
महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! पडळकर खोत आता ऊस उत्पादकांसाठी मैदानात, सरकार एकरकमी FRP चा निर्णय घेणार?
अतिरिक्त ऊसाचा प्रश्न लागणार मार्गी! 'या' विभागातील मोठ्या 35 साखर कारखान्यांवर टाकली जबादारी
वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरूच; काही वेळातच झाले होत्याचे नव्हते...
Share your comments