1. कृषीपीडिया

शेती पूरक रेशीम उद्योग : कमी कालवधीमध्ये येते दमदार उत्पादन

दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय या सारखाच रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पध्दत व नवीन कीड संगोपन पध्दत यामुळे हा व्यवसाय कमी मजूर असतानाही मोठया प्रमाणात करता येतो.

KJ Staff
KJ Staff


दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय या सारखाच रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पध्दत व नवीन कीड संगोपन पध्दत यामुळे हा व्यवसाय कमी मजूर असतानाही मोठया प्रमाणात करता येतो. घरातील लहान थोर माणसांचा उपयोग या व्यवसायात करून घेता येतो. शेतकऱ्यांना कमीत-कमी महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळविता येते. पक्का माल खरेदीची शासनाने निश्चित दराची हमी दिलेली आहे. तुती लागवड, निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते. या पट्टा पध्दतीने लागवड केल्याने तुती लागवडीपासून पाल्याच्या उत्पान्नात वाढ होते. पट्टा पध्दतीस अत्यंत कमी पाणी लागते. एक एकर ऊस लागणाऱ्या पाण्यात 3 एकर तुती जोपासता येते.

तुतीची लागवड एकदा केल्यानंतर 15 वर्षापर्यंत जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही.  त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकांप्रमाणे वारंवार येत नाही. तुतीस एप्रिल, मे, महिन्यात पाण्याचा तुटवडा आपल्याकडे जाणवत असतो, पण पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. पाणी मिळाल्यानंतर तुती पुन्हा जोमाने वाढते. यामुळे आठमाही पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यास देखील हा व्यवसाय करता येतो. कमीत कमी बागायत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांपासून तो जास्तीत जास्त बागायत क्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा व्यवसाय चांगल्या रितीने करता येतो. ऊस, द्राक्षे यासारखी नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील हा व्यवसाय चांगल्या रितीने करता येतो.

पट्टा पध्दतीने तुतीची आंतरमशागत मजूरांऐवजी अवजाराने कमी खर्चात व कमी वेळेत वेळेवर करुन घेता येते. यामुळे मजूरी खर्चात व वेळेत मोठया प्रमाणात बचत होते. पट्टा पध्दतीने लागवड केल्याने तुती शेतीत इतर आंतरपिके घेवून उत्पन्नात भर घालता येते. तुती बागेस रोग व किटक यांचा प्रार्दुभाव होत नसल्याने औषधोपचाराचा खर्च वाचतो. रेशीम अळयांची अंडीपुंज सवलतीच्या दराने 450 टक्के अनुदान दरात शासनामार्फत पुरवली जातात. रेशीम अळयांचे एकूण 28 दिवसांचे आयुष्यमान असते. त्यातील 24 दिवसच त्यांना तुतीचा पाला खाद्य म्हणून द्यावा लागतो. या 24 दिवसांपैकी सुरुवातीचे 10 दिवस शासनामार्फत वाजवी दराने रेशीम किटक जोपासून दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांस अवघ्या 14 दिवसांत कोश उत्पादनाचे पीक घेता येईल. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम, व पैसा वाचेल व तसेच एकूण उत्पादनात 25 टक्क्यांपर्यंत वाढ होईल.


शेतीमध्ये रेशीम कोशाशिवाय अवघ्या 14 दिवसांत उत्पन्न देणारे आज एकही नगदी पीक नाही. सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरीशिवाय यात दरमहा उत्पन्न मिळविता येते. तसेच महिन्यात रविवारप्रमाणे चार दिवस सुट्टी उपभोगता येते. इतर शेती पिकांप्रमाणे यात पूर्ण व मोठया प्रमाणात नुकसान होत नाही. शेतकऱ्यांच्या कोश खरेदीची हमी शासनाने घेतलेली असून त्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्याठिकणी कोश खरेदी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सदर कोश खरेदी ही शास्त्रीय पध्दतीने होत असून त्याचा दर रु. 65/- ते रु.130/- प्रती कि आहे.

 रेशीम उद्योगातून इतर फायदे

  •  रेशीम अळयांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रास प्रमाणे खाद्य म्हणून वापरता येते. यातून 1 ते दीड लिटर दूध वाढते.
  • वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करुन उत्तमप्रकारे गॅस मिळतो.
  • तुतीच्या वाळलेल्या इंधन म्हणून वापरता येतात. तसेच खत म्हणून सुध्दा वापरता येते.
  • संगोपनाक वापरलेल्या चोथा करुन त्यावर अळींची लागवड करता येते व त्यानंतर चोथ्यापासून गांडूळ खत करता येते.
  • रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळते व देशाच्या विकासात हातभार लागतो.

 तुतीची दरवर्षी तळ छाटणी करावी लागते. या छाटणी पासून मिळणारी तुती कोश शासनामार्फत खरेदी केली जातात. त्यामुळे एकरी रु 3500/- ते 4500/- जास्तीचे उत्पन्न प्रतीवर्षी मिळते.  तुतीच्या पानांमध्ये व ये जीवनसत्वाचे प्रमाण बरेच आढळते. त्यामुळे तुतीचा पाला व रेशीम कोश प्युपा आर्युर्वेदिक दृष्ट्या महत्वाचा आहे. विदेशात तुतीच्या पानांचा चहा मलबेरी टी करतात. शिवाय वाईन करतात.  कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो. रेशीम कोष रेषीम किटकंच्या जीवन चक्रातील 5 व्या अवस्थेनंतर लाळेद्वारे सिल्कचा स्त्राव सोडून किटक स्वतः भोवती 48 ते 72 तासात सुरक्षा कवच बनवतो. त्यालाच रेषीम कोष म्हणतात. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने संकरित व दुबार जातीचे कोष उत्पादन घेतले जाते. सुणर्व आंध्र, कोलार गोल्ड या बहुवार सी. बी. जातीचे व सी. एस. आर. आणि सी. एस. आर. हायब्रीड हे दुबार जातीचे संगोपन केले जाते.

संचालनालयामार्फत आधारभूत दराने प्रतवारीनुसार कोष खरेदी केले जातात. प्रचलित कोष उत्पादन वाढीसाठी केंद्र व राज्यशासनाच्या आर्थिक सहाय्याने किटक संगोपनासाठी लागणाऱ्या स्वच्छ करणाऱ्या  औषधांच्या पुरवठा केला जातो. एका कोषाचे वनज 1.5 ते 2 ग्रॅम पर्यंत असते.  त्यापासून 1000 ते 1200 मीटरपर्यंत सलग धाग्याची निर्मिती होते.  शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले कोष खरेदीसाठी शासना व्यतिरिक्त खाजगी व्यापारी डीलर घटकांमार्फत खरेदी करण्यासाठी बाजारपेठ निर्मिती केलेली आहे. राज्याबाहेर ही शेतकरी कोष विक्री करू शकतो.   रेशीम अळीचे अंडिपुंजातून बाहेर आल्यानंतर पाच अवस्थेपासून संक्रमण करून साधारणतः 26 ते 27 दिवसानंतर पाला खाण्याचे प्रमाण कमी होऊन अळीची कोशी कमी होते व तोंडावाटे सिल्क धागा सोडण्यास सुरूवात करते.  अशा अळया कोष निर्मितीकरीता प्लास्टिक /बांबु चंद्रिकेवर सोडण्यात येतात.  रेशीम अळी स्वतःभोवती धागा गुंडाळते व कोष बनविण्याची प्रक्रिया 4 ते 5 दिवसात पूर्ण होते. या अवस्थेत रूममधील तपमान 24 डि. ग्री. से.  आर्द्रता 60 ते 65 टक्के व खेळती हवा असणे गरजेचे असते. कोषावर आलेली अळी जवळपास 1000 ते 1200 मीटर लांबीचा धाग सोडते. एका प्लास्टिक चंद्रिकेवर 400 ते 500 कोष तयार होऊ शकतात. एका कोषाचे वजन साधारणतः 1.5 ते 1.8 मी. असते. कोषातील रेशीमाचे प्रमाणे साधारणतः 18-20 टक्के असते.


चंद्रिकेवर कोषावर आलेली अळी सोडल्यास 4 ते 5 दिवसात कोष तयार होतात. एका कोषाचे वजन साधारणतः 1.5 ते 1.8 ग्रॅम असते. चंद्रिकेवरून 5 व्या दिवषी कोष काढले जातात. सदरचे कोष विक्री करता पातळ पोत्यामधून व थंड वातारणामध्ये वाहतुक केली जातात सदर पूर्ण झालेला कोष हा बायहोल्टाईन जातीचा (पांढरा) आहे. या बायहोल्टाईन पांढऱ्या कोशापासून उत्पादीत केलेल्या सुतास जागतिक मागणी आहे. एका किलो ग्रॅम मध्ये 600 ते 1000 कोष बसतात. प्रति किलो ग्रॅम रेषीम कोषास रू. 90 ते 150/- पर्यंत ग्रेडनिहाय दर संचालयामार्फत प्रचलित आहेत.

 

लेखक -

1)   अर्जुन आनंदराव खरात. मो. न.8390495617

2)        अनिता भगवान सानप.

 सहाय्यक प्राध्यापक, रंगनाथ महाराज कृषी महाविद्यालय, नाव्हा, जालना.

3)        सुशील पं. दळवी             

सहा. प्रा. विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा बु.

English Summary: Sericulture production comes in short time Published on: 17 July 2020, 10:31 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters