1. बातम्या

संकटात सापडलेल्या शेतकरी कुटूंबाच्या सांत्वनपेक्षा लोकप्रतिनिधींना सत्तापालटच्या कामात रस - प्रशांत डिक्कर.

जळगाव जा.- ज्या मतदारांनी आपल्याला लोकप्रतिनिधित्वाचे छत्र बहाल केले.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
संकटात सापडलेल्या शेतकरी कुटूंबाच्या सांत्वनपेक्षा लोकप्रतिनिधींना सत्तापालटच्या कामात रस -  प्रशांत डिक्कर.

संकटात सापडलेल्या शेतकरी कुटूंबाच्या सांत्वनपेक्षा लोकप्रतिनिधींना सत्तापालटच्या कामात रस - प्रशांत डिक्कर.

जळगाव जा.- ज्या मतदारांनी आपल्याला लोकप्रतिनिधित्वाचे छत्र बहाल केले. त्याच भरवश्यावर आपला राजकीय क्षेत्रात मोठा गाजावाजा एवढेच काय ज्या मतदार राजाने आपल्याला राजकारणाची एवढी भट्टी चालवायला दिली. पण याच मतदारसंघात लोक अपघाताने अवकाळी मरत असतांना त्यांचे साधे सांत्वन करण्यासही त्या लोकप्रतिनिधींनी येऊ नये यापेक्षा त्या मतदारांचे दुर्दैव कोणते असू शकते. अशा संतप्त प्रतिक्रिया जळगाव, संग्रामपूर तालुक्यातील जनतेत व्यक्त होत आहेत. सत्ता स्थापनेच्या राज्यातील सारीपाटावर १५ दिवसापासून धूम ठोकून पळत असतांना या आपदग्रस्त कुटुंबाचे सात्वन करणार तरी कोण असा सवाल स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केला आहे. गेल्या ८ ते १० दिवसात जवळपास ६ ते ७ जणांचे अपघाती निधन झाले. 

यात पळशी झाशी येथिल घटनेत २ युवक जागेवर ठार झाले. हे दोघेही मोल मजुरी करणारे अल्पभूधारक शेतकरी कुटुंब प्रमुख होते. आभाळ फाटल्यागत या कुटुंबावर आपत्ती आली असतांना आमदार संजय कुटे खासदार प्रतापराव जाधव या दोघांपैकी एकानेही ढुंकूनही सुद्धा पाहिले नाही. ही शोकांतिकाआहे. ह्या अशा कुटुंबाचे सांत्वन करण्यापेक्षा या लोकप्रतिनिधींना राज्यातील सत्ता पालट करण्यातच रस होता ही बाब आता लपून राहिली नाही. बंडखोरांच्या मदतीचे नवीन शिंदे सरकार येऊन ४ ते ५ दिवस होऊन गेले तरी या दोघांपैकी एकानेही त्या मृत्यू घरी सात्वंनपर भेट दिली नाही. विधानसभा लोकसभेत ३ ते ४ वेळा निवडून आल्यामुळे या आमच्या लोकप्रतिनिधींना आता काही फार येथील जनतेशी घेणे देणे नाही असाच याचा सरळ अर्थ आहे. 

हे कोणीही नाकारू शकत नाही तसेच याच ८ ते १० दिवसात जळगाव जामोद तालुक्यातील आढोळ,निंभोरा, या गावातील दोघांचा वीज पडून जागेवरच मृत्यू झाला सावरगाव दाभाडे या गावातील आमची एक महिला शेतकरी माऊली पुरात वाहून गेली अशा एकूण ६ ते ७ घटना घडून गेल्या पण एकाही मरणदारी या संजय कुटे प्रतापराव जाधव यापैकी एकानेही साधी भेट सुद्धा दिली नसल्याने त्या त्या गावातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. खरीप हंगाम ची पेरणी शेतकऱ्यांसाठी वर्षभराची महत्त्वाची खेप असते. यावर्षी पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना अनेक समस्यांशी तोंड द्यावे लागले. बियाणे रासायनिक खते खरेदी करतांना अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली पण प्रशासनांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते.

पंरतु आमदार संजय कुटे हे मात्र राज्याच्या शिंदे सरकार रामायणात चौरस खेळत होते. हे येथील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. आता राज्यात सत्तापालट झाला त्यांच्या मनासारखे होऊन गेले आता हे लोकप्रतिनिधी या लोकांच्या घरी सांत्वनपर भेटी देतीलही पण ते आता काय कामाचे असा सवाल व्यक्त होत आहे. कारण तुमचा राजकीय कार्यभार मतलब पूर्ण झाल्यावर हे लोकप्रतिनिधी भेट देतिलही ती काय कामाची अशी चर्चा होत आहे. दोन दिवसापूर्वी राज्यात सत्तास्थापन झाली असली तरी या दोन तालुक्यातील भाजपामध्ये जल्लोष दिसून आला नाही कारण मी पुन्हा येणार म्हणणाऱ्याला रोखल्या जाऊन उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले म्हणूनच कदाचित येथील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला नसावा सत्ता तर आली पण काय कामाची ही सत्ता पालट म्हणजे सुतकात अपत्य झाल्यासारखी गत भाजपाची झाली असल्याची प्रतिक्रिया प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना व्यक्त केली.

English Summary: People's representatives are more interested in the work of change of government than the consolation of the distressed farmer family - Prashant Dikkar. Published on: 02 July 2022, 07:08 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters