शेतकरी मित्र शेती बरोबरच अनेक जोडव्यवसाय करून आपले उत्पन्न वाढवत असतो त्यासाठी तो अनेक शेती संलग्न व्यवसाय करतो यामध्ये तो शेळीपालन, पशुपालन, दुग्ध्यवसाय या सारखे व्यवसाय करत आहे.
राज्यावर लम्पीरोगाचा प्रादुर्भाव:-
सध्या राज्यातील जनावरांवर लम्पी या साथीच्या रोगाचं संकट ओढवले आहे. या रोगामुळे जनावरे मोठ्या प्रमाणावर दगावत आहेत. लम्पीरोगाचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर 5 से.मी. व्यासाच्या गाठी येतात. तसेच जनावरांच्या पायावर सूज आल्याने जनावर लंगडते. एवढेच नाहीतर यामुळे जनावराची तहान-भूक कमी होते. याचा परिणाम त्याच्या दुग्ध व्यवसायावर ही मोठ्या प्रमाणात होतो.
लम्पीरोगाचा प्रादुर्भाव या राज्यांमध्ये सुद्धा:-
लम्पी हा रोज जनावरांमध्ये झपाट्याने पसरत चालला आहे हा आजार फक्त महाराष्ट्रात राज्यातच नाही तर राजस्थान, मध्यप्रदेश, गुजारत, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशात या राज्यात सुद्धा या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. शिवाय राजस्थान मद्ये आतापर्यंत 60 हजार जनावरे या आजाराने दगावली आहेत.
हेही वाचा:-नुकसानीमुळे भाजीपाल्याची आवक घटली, भाजीपाल्याचा भावात प्रचंड वाढ
लम्पीरोगाचा मानवी जीवनावर परिणाम:-
राजस्थानातील या आजाराने हजारो जनावरे दगावली असल्यामुळे नागरिकांनी दूध पिणेच बंद केले आहे. दूध पील्यामुळे माणसांनाही या आजाराची लागण होते अशी अफवा सध्या पसरत आहे. त्यामुळे याचा परिणाम हा दूध पुरवठ्यावर झालेला दिसून येत आहे. लम्पीग्रस्त जनावरांच्या दूधापासूनही माणसांना कोणताही धोका नाही. पण कच्चं दूध न पिता ते उकळून घेऊन प्यावं असा सल्ला सुद्धा दिला जात आहे.
शेतकरी वर्गाने ही काळजी घ्यावी:-
लम्पी स्कीन हा एक संसर्गजन्य रोग आहे त्यामुळे तो झपाट्याने वाढत चालला आहे. याचा कोणताही परिणाम माणसावर होत नाही परंतु थोडी दक्षता घेणे खूप गरजेचे आहे. दक्षता म्हणून लम्पीग्रस्त जनावराची धार काढताना हातमोजे, मास्क वापरणे गरजेचे आहे. शिवाय या जनावरांच्या दूधापासूनही काही धोका नाही. पण अशा जनावरांचे दूध उकळून पिले तर अधिक चांगले असा सल्ला पशूसंवर्धन विभागाने शेतकरी वर्गाला दिला आहे.
Share your comments