गेल्या काही दिवसांपासून येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे सध्या वातावरण तापले आहे. असे असताना आता कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याला एक पत्र लिहिले आहे.
यामुळे याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. यामध्ये या पत्रात व्याजासहित एफआरपी आणि मुदत संपलेली रूपांतरित ठेव मागितली आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फेऱ्या झडत आहेत.
दरम्यान, कारखान्याने गाळप हंगाम संपल्यानंतर अजूनही संपूर्ण एफ आर पी दिलेली नाही. यामुळे शेतकरी नाराज आहेत. ही संपूर्ण एफ आर पी व्याजासह देण्याचा नियम असल्याने आता एफ आर पी देताना व्याजासहित द्यावी.
तसेच मुदत संपलेली रूपांतरित ठेव सभासदांना विलाविलंब मिळावी, अशी मागणी जाचक यांनी केली आहे. यामुळे कारखाना काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता निवडणुका तोंडावर असताना कारखाना काय निर्णय घेणार हे येणाऱ्या काळात समजेल. सध्या कारखान्याची निवडणूक जाहीर झालेल्या असून मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.
जगातील सर्वात महागडी म्हैस, किंमत आहे 81 कोटींहून अधिक, वाचा काय आहे खास..
यामुळे येणाऱ्या काळात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वजण निवडणुकीची वाट बघत आहेत. दरम्यान, या निवेदनाच्या प्रती सहकार आयुक्त, साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालकांसह राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला दिलेल्या आहेत.
निंबोळी अर्क कसा तयार करावा? निंबोळ्या सध्या पक्व होण्याच्या मार्गावर...
केळीला हमीभाव निश्चित करा, वाढलेला उत्पादन खर्च पाहता शेतकरी अडचणीत..
बांगलादेशने निर्बंध हटवल्याने कांदा दरात वाढ
Share your comments