शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना अवजारे बक्षिस योजना जाहीर करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे महत्त्व देखील समजणार आहे.
यासाठी विठ्ठल जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी सिंगापूर गावात १ रुपयात पीकविमा अर्ज भरण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. तसेच शेतकऱ्यांना याबाबत माहिती देखील देण्यात आली.
यामध्ये भाग्यवान शेतकऱ्याला कुट्टी मशिन, फवारणी पंप व इतर शेतकऱ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. दरम्यान, शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान पंतप्रधान खरीप पीकविम्यामार्फत शेतकऱ्यांना मिळू शकते.
टोमॅटोने भारताला रडवले, आता तांदूळ जगाला रडवणार! कारण काय जाणून घ्या..
शासनाने पीकविमा एक रुपयांमध्ये केला आहे. मात्र शेतकऱ्यांमध्ये पीकविम्याबाबतीत उदासीनता दिसून येत आहे. यासाठी ही योजना केल्याचे ते म्हणाले.
यामुळे याची शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जगताप यांनी पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना ३० हजार रुपये किमतीची कुट्टी मशिन, फवारणी पंप व इतर शेतीउपयोगी साधने बक्षीस स्वरूपात ठेवली आहेत. यामुळे शेतकरी येत आहेत.
सासवडमध्ये ज्वारीला उच्चांकी ६३११ रुपये दर, शेतकऱ्यांना दिलासा...
परिणामी सिंगापूर, आंबळे येथील कांदा, बाजरी, भुईमूग उत्पादकांनी सहभाग घेत पीकविमा उतरविला. यामुळे याकडे आता शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे.
भारतातील या राज्यात सर्वाधिक महाग टोमॅटो विकला जातोय, तोडले सगळे रेकॉर्ड..
राज्यात आता खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालये, राज्य सरकारचा निर्णय...
Share your comments