1. बातम्या

आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम द्या - दादाजी भुसे

मालेगाव : खरीप हंगामाच्या (Kharif) तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अवकाळी पावसाची नुकसान भरपाई (Copensation), पिक विम्यासह विशेष अर्थसहाय्य योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वितरित करण्यात आलेल्या रकमा आठवड्याभरात शेतकऱ्यांना वाटप करण्याचे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse)यांनी दिले आहेत.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
कृषिमंत्री दादाजी भुसे

कृषिमंत्री दादाजी भुसे

मालेगाव : खरीप हंगामच्या (Kharif) तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अवकाळी पावसाची नुकसान भरपाई (Copensation), पिक विम्यासह विशेष अर्थसहाय्य योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वितरित करण्यात आलेल्या रकमा आठवड्याभरात शेतकऱ्यांना वाटप करण्याचे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse)यांनी दिले आहेत. खरीप हंगामाच्या अनुषंगाने पिक कर्ज वाटपाची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते,

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी बांधव शेतीच्या मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. त्यांना आज आर्थिक मदतीची गरज असून शासनामार्फत नुकसान भरपाई पोटी वितरित करण्यात आलेल्या रकमेवर कॅपिंग लावून शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीपासून वंचित ठेवल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ही बाब योग्य नसून पुढील आठ दिवसांत शेतकऱ्यांना मदतीच्या रकमांचे वाटप करण्याच्या सूचना मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या. जिल्हा बँकेच्या सर्व शाखा प्रमुखांनी लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना याबाबत अवगत करण्याबाबतही निर्देशित केले.
तालुक्यात किमान 75 कोटीचे पिक कर्ज वाटप करावे

कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच बळीराजाही प्रभावीत झाला आहे. या संकटकाळात येत्या हंगामासाठी त्याची आर्थिक मदतीची गरज ओळखून जिल्हा बँकेसह सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी पुढाकार घेवून मोठ्या प्रमाणात पिक कर्जाचे वाटप करण्याचे आवाहन करतांना यावर्षी तालुक्यात किमान 75 कोटीचे पिक कर्ज वितरित करण्याच्या सुचनाही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या.

 

शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करून ब-सत्ताप्रकार म्हणून नोंदविलेल्या जमिनींचे भोगवटादार वर्ग-1 या धारणाधिकारामध्ये रुपांतरीत करण्यासाठी तालुक्यातील काही प्रकरणे मुल्यांकनाअभावी प्रलंबीत आहेत. शासनाच्या दरसुचीमधून सुटलेल्या मिळकतींचा समावेश होण्यासाठी पुढील पंधरा दिवसात कार्यवाही करण्याच्या सुचना मंत्री श्री.भुसे यांनी दिल्या आहेत.

ब-सत्ता प्रकारातील प्रलंबीत प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी डॉ.विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, नगर भुमापन अधिकारी जितेंद्र भिंगारदिवे, उपअधिक्षक भुमी अभिलेख भगवान शिंदे, सहायक दुय्यम निबंधक पी.एन.लहाने, एस.व्ही.वाघ, पी.डी.वाघचौरे, संजय दुसाणे, ॲड.सतिष कजवाडकर, बंडू माहेश्वरी आदि उपस्थित होते.

 

महसूल व नगर भुमापन विभागाने समन्वय साधत सातबारा उतारा व मिळकत पत्रिकेमध्ये मेळ घालून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करावे. सत्ता प्रकार बदलामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे, त्याच बरोबर नागरिकांचे देखील प्रलंबीत प्रश्न मार्गी लागणार असल्याने प्राधान्याने ही प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्याच्या सुचनाही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या.

English Summary: Pay compensation to farmers within a week - Dadaji Bhuse Published on: 18 May 2021, 05:53 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters