1. बातम्या

हवामान अंदाजा विषयी शेतकऱ्यांमध्ये विश्वासाच नाव आहे पंजाबराव डख, जाणून घेऊय त्यांच्याबद्दल

भारतामध्ये हवामानाचा अंदाज व या बाबतीत अभ्यासासाठीभारतीय हवामान खाते आहे. हवामानविषयक सगळी माहिती हवामान विभागा द्वारे प्रसारित केली जाते. परंतु हवामान विभागाच्या अंदाजावर कोणाचा किती विश्वास आहे हा एक संशोधनाचा विषय आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
punjabrao dakh

punjabrao dakh

 भारतामध्ये हवामानाचा अंदाज व या बाबतीत  अभ्यासासाठी भारतीय हवामान खाते आहे. हवामानविषयक सगळी माहिती हवामान विभागा द्वारे प्रसारित केली जाते. परंतु हवामान विभागाच्या अंदाजावर कोणाचा किती विश्वास आहे हा एक संशोधनाचा विषय आहे.

परंतु महाराष्ट्रामध्ये एक नाव असे आहे की ज्यांच्यावर महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड प्रमाणात विश्वास ठेवतात. या विश्वासामध्ये कारणही तसेच आहेत. ते विश्वासाचं नाव आहे पंजाबराव डख.  त्यांच्याबद्दल या लेखात माहितीघेऊ.

कोण आहेत पंजाबराव डख?

 आपल्याला माहित आहेच कि पंजाबराव डक हवामान तज्ञाचे नाव आहे. आज महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज व्हाट्सअप आणि युट्युब वर कधी येतील याची आतुरतेने वाट बघत असतात.कारण त्यांनी केलेल्या अंदाजामुळे लाखो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळलेआहे तसेचअनेकांना फायदा देखील झाला आहे.

 पंजाबराव डख परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे अंशकालीन शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना लहानपणापासून हवामानाबद्दल कुतूहल होते. या कुतूहलापोटी त्यांनी सी-डॅक चा कोर्स केला.पंजाबराव हेवर्षाच्या सुरुवातीला हवामान अंदाज व्यक्त करतात.दर महिन्याच्या कुठल्या तारखेला काय हवामानअसेल अशा प्रकारचा तो अंदाज असतो आणि बऱ्याच वेळेस तो खरा ठरतो.पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज हा ढोबळ नसतो.त्यांची हवामान अंदाज व्यक्त करण्याचे विशेषता म्हणजेते अंदाज व्यक्त करताना जिल्हानिहाय हवामान अंदाज  व्यक्त करतात.एवढे  सूक्ष्मपणे निरीक्षण करून तेअंदाज व्यक्त करतात आणि जेव्हा तो अंदाज बरोबर येतो तेव्हा लोकांचा विश्वास त्यांच्यावरचा दृढ होत जातो.

 

 पंजाबराव डक यांच्या कामाची दखल म्हणून परभणीच्या पालकमंत्र्यांनी डख यांची निवड राज्याच्या कृषी सल्लागार समितीत करावी अशी शिफारस कृषी मंत्र्यांकडे केली आहे.जेव्हा शेतकरी पंजाब डख यांच्या खात्यावर कृतज्ञता म्हणून पैसे पाठवू लागले तेव्हा त्यांनी एक व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे काम शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी निशुल्क  करत आहोत.म्हणून कोणीही पैसे पाठवू नये अशी विनंती केली. त्यांच्या या कृतीने शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल असलेला आदर द्विगुणित झाला. ( साभार-बोभाटा.कॉम)

English Summary: panjabrao dakh is name of perfect meterological guess Published on: 02 October 2021, 09:04 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters