पणन टप्प्या टप्प्याने बंद करणार कापूस खरेदी

11 February 2021 03:47 PM By: KJ Maharashtra

यावर्षी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाच्या वाढत्या मागणीमुळे बाजारात कापसाच्या भावात तेजी आढळून येत आहे. हमीभावापेक्षा जास्त दराने खरेदी होत असल्याने हमीभाव केंद्र ओस पडत चालली आहेत.

त्यामुळे पणन महासंघाने येत्या 15 तारखेपासून कापूस हमीभाव केंद्र टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोना काळात असलेल्या लॉक  डाऊन मध्ये कापड उद्योगाला सूट दिल्याने कापसाची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी वाढली परंतु त्या मागणीच्या तुलनेत कापसाचा पुरवठा कमी राहिला. त्यामुळे कापसाला हमीभावापेक्षा जास्त किंमत मिळाल्याने सी सी आय तसेच पणन महासंघाच्या खरेदी केंद्रांवर कापसाची आवक अत्यंत कमी होत आहे. जर आजवरच्या सीसीआय आणि पणन महासंघाचे खरेदीचा विचार केला तर सीसीआई ने आज पर्यंत 47 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आणि पणन महासंघाने 36 लाख क्विंटल खरेदी केली आहे.

Cotton पणन महामंडळ कापूस खरेदी cotton federation
English Summary: panan will stop buying cotton in phases

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.