आपण बघतोय की श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. यामुळे देशावर मोठे आर्थिक संकट आले आहे. आता असाच काहीसा प्रकार पाकिस्तानमध्ये सुरू आहे. सध्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) राजकीय वातावरण तापले असता आता इंधन दरामध्ये (Petrol Rate) वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांचे मोठे हाल सुरू आहेत.
पेट्रोल आणि डिझेलचा (petrol diesel price) दर प्रतिलीटर 30 रूपयांनी वाढला आहे. तसेच पेट्रोलचा दर वाढल्याने त्याचा परिणाम इतर वस्तूच्या किमतीवर होणार आहे. इंधन वाढ झाल्याने (Islamabad) एक लिटर पेट्रोलसाठी 179 रूपये 86 पैसे मोजावे लागणार आहे. हे दर रात्रीपासून वाढले आहे. यामुळे लवकरच श्रीलंकेसारखी परिस्थिती पाकिस्तानमध्ये येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच डिझेलसाठी 174 रूपये 15 पैसे मोजावे लागणार असून केरोसिनच्या किंमतीमध्ये 30 ची वाढ झाली आहे. IMF सोबतची चर्चा अयशस्वी झाल्याने आज मध्यरात्रीपासून पेट्रोलचे दर प्रति लिटर 30 रुपयांनी वाढणार, अशी माहिती देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना वीज बिल माफी!! अर्थसंकल्पात योगी सरकारची मोठी घोषणा..
पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ता इस्माईल (Mufti Ismail) यांनी गुरुवारी पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीमध्ये ऐतिहासिक वाढ केली असल्याची घोषणा केली. यामुळे येणाऱ्या काळात लोकांच्या रोषाला येथील सरकारला जावे लागणार आहे.
सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा! पंतप्रधान आवास योजनेची रक्कम वाढणार, आता मिळणार ४ लाख..
इस्माइल यांनी सांगितले की, सरकारकडे किंमती वाढवण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता. तर नव्या दरांमध्ये डिझेलवर आम्हाला प्रतीलिटर ५६ रुपयांचा नुकसान सहन करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आता पुढील काही वर्षात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
उसाला 75 रुपये मिळणार? अतिरिक्त उसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
आता कोल्हापूर सांगलीत पूर येणार नाही, अलमट्टी धरणाबाबत झाली महत्वपूर्ण बैठक
एकीचे बळ! मल्चिंग पेपरचे गाव, आधी दुष्काळग्रस्त म्हणून ओळख, आता झाले बागायती
Share your comments