संपूर्ण भारतात गाईच्या शेणापासून तयार झालेला वेदिक पेन्टच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण उद्योजक या क्षेत्रात आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
तसेच या प्राकृतिक पेन्टच्या प्रसारासाठी आपण सदिच्छादूत म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जयपुर मध्ये शेणा पासून रंग तयार करण्याच्या स्वयंचलित यंत्राच्या उद्घाटन करताना ते बोलत होते.
या वर्षी 12 जानेवारी ला नितीन गडकरी यांनी खादी ग्रामोद्योग आयोग गाणं शेणा पासून बनवलेल्या पेंटचे लॉन्चिंग केले होते. तेव्हा त्यांनी सांगीतले होते की शेनापासून बनवलेला रंग हा विषमुक्त आणि इको फ्रेंडली असा आहे.
कशाच्या रंगाला भारतीय प्रमाणीकरण संस्थेकडून प्रमाणित करण्यात आल आहे. या रंगाचे पेटंट हे कुमरप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूटने मिळवले आहे.या रंगामध्ये शिसे, पारा, क्रोमियम, आर्सेनिक आणि कॅडमियम चा वापर केला आहे. या शेणा पासून बनवलेल्या रंगाची विक्री जर वाढली तर शेतकऱ्यांच्या कडे असलेल्या शेणाची खरेदी वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडून कमीतकमी वर्षाकाठी तीस हजार रुपये त्यांना शेण विक्रीतून मिळू शकत.
सध्या जयपूरमध्ये याबद्दल प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी अनेक जण वेटिंग लिस्टमध्ये आहेत. हे प्रशिक्षण सात दिवसांचे असेल. आगामी काळात ट्रेनिंग मधील सुविधा वाढविण्याचा विचार असल्याचे गडकरी म्हणाले. त्यामुळे गावातील लोक शेणा पासून रंग बनवण्याचे कंपनी स्थापन करू शकतात.
Share your comments