1. बातम्या

विदर्भातील संत्र्याला गळन व शंखअळीचा प्रादुर्भाव, बागायतदार चिंतेत

विदर्भाची संत्री त्याच्या आंबट गोड चवीसाठी जगप्रसिद्ध आहे. दरवर्षी संत्र्याला विदेशातही मोठी मागणी राहते. नागपूर व अमरावतीची संत्री म्हणून ही संत्री खरेदी करणारेही अनेकजण आहेत.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

अमरावती : विदर्भाची संत्री त्याच्या आंबट गोड चवीसाठी जगप्रसिद्ध आहे. दरवर्षी संत्र्याला विदेशातही मोठी मागणी राहते. नागपूर व अमरावतीची संत्री म्हणून ही संत्री खरेदी करणारेही अनेकजण आहेत. परंतु ही संत्री उत्पादन करणारा शेतकरी मात्र गेल्या अनेक वर्षांपासून संकटात सापडलेला आहे. सातत्याने होणारी संत्रा गळती व शंखअळीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.

सातत्याने सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आले असतानाच तिकडे या पावसाचा फटका फळबागांना ही बसत आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी तालुक्यात सर्वाधिक संत्रा फळांचे उत्पादन घेतले जाते. परंतु सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे संत्रा झाडांवर ही विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून मागील तीन महिन्यांपासून संत्राची गळती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या लाखो रुपयाचा संत्रा हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : संत्रा पिकावरील प्रमुख रोग व त्यांचे व्यवस्थापन

सध्या संत्राला आंबिया बहार आला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही या शेतकऱ्यांनी संत्रा बागांवर लाखो रुपये खर्च केला होता. हजारो खर्च करून फवारणी या शेतकऱ्यानी केली परंतु यंदाही जुलै महिन्यापासून संत्रा गळतिला सुरुवात झाल्याने निम्यापेक्षा जास्त संत्राची फळे हे गळून पडले आहेत. त्यामुळे लावलेले पैसे ही निघनार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहला आहे. अमरावती जिल्ह्यातील बहादा येथील संत्रा उत्पादक शेतकरी भाऊराव वानखडे यांच्याकडे १३०० संत्रा झाडे आहेत. मात्र, यंदा१२ ते १३ लाखांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित होतं मात्र संत्रा गळन व शंखअळीने त्यांच उत्पन्न पूर्णपणे घटणार आहे तर यावर उपाय योजना कृषी विभागाने करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरवर्षी मोठ्या प्रमाणावर संत्रा गळती होते.

 

परंतु यावर कृषी विभागाने मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. परंतु कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी संत्रा बागांमध्ये फिरकतही नसल्याचा आरोप देखील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. एकीकडे शासनाकडून संत्रा उत्पादन उत्पादनावर उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले जाते.

परंतु वास्तविकता मात्र कृषी विभागाकडून कुठलाच मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रारही यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. संत्रा बागांमध्ये संत्रा गळती बरोबरच शंकू अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे. या शंखू अळीमुळे संत्रा झाडांच्या साली खराब होत असून संत्रा झाडांच आयुष्यही कमी होत आहे.

English Summary: Outbreaks appear to be exacerbated during this time Published on: 14 September 2021, 08:31 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters