1. फलोत्पादन

संत्रा पिकावरील प्रमुख रोग व त्यांचे व्यवस्थापन

शेतकरी बंधूंनो आज आपण संत्रा पिकावर कोणत्या प्रमुख रोगाचा प्रादुर्भाव होतो व त्याच्या व त्याकरता व्यवस्थापन योजना याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
Management of major diseases on orange crop

Management of major diseases on orange crop

शेतकरी बंधूंनो आज आपण संत्रा पिकावर कोणत्या प्रमुख रोगाचा प्रादुर्भाव होतो व त्याच्या व त्याकरता व्यवस्थापन योजना याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

( A) डिंक्या : डिंक्‍या हा बुरशीजन्य रोग असून या रोगात झाडाच्या सालीतून डिंकासारखा पदार्थ ओघळताना दिसतो. झाडाच्या सालीचा रंग लालसर होऊन शेवटी काळपट होतो. रोगट लाल साल वाळून तिला उभ्या भेगा पडतात.

व्यवस्थापन योजना : (१) संत्रा पिकाला ठिबक सिंचनाने ओलित करावे. (२) ठिबक सिंचन पद्धत उपलब्ध नसल्यास संत्रा पिकाला डबल रिंग पद्धतीने पाणी द्यावे म्हणजे झाडाच्या बुंध्याभोवती दोन वर्तुळाकार आळे तयार करून त्यामधून बांगडी पद्धतीने पाणी द्यावे व संत्र्याच्या बुंध्याला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. (३) संत्रा बागेत पावसाळ्यात जास्तीचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व जास्तीचे पाणी संत्रा बागेत साचले तर संत्रा झाडाच्या दोन ओळीत चर खोदून पाण्याचा योग्य निचरा होईल याची काळजी घ्यावी.

(४) संत्रा लागवडीकरता उंच डोळा बांधणीच्या कलमाचा वापर करावा. (५) रोगग्रस्त झाडाची साल निर्जंतुक केलेल्या धारदार पटाशी ने काढून किंवा चाकूने काढून रोगट भाग एक टक्का पोटॅशिअम परमॅग्नेट च्या द्रावणाने म्हणजे दहा लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम पोटॅशियम परमॅग्नेट टाकून तयार केलेल्या द्रावणाचा वापर करून निर्जंतुक करून घ्यावा व त्यावर बोर्ड मलम (Bordo paste) १:१:१० लावावा. (६) Cymoxnil 8 percent + Mancozeb 64 percent डब्ल्यू पी या मिश्र बुरशीनाशकाची 25 ग्रॅम अधिक 50 मिली जवस तेल अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन झाडाच्या परिघामध्ये मिसळावे (७) संत्रा झाडाच्या बुंध्यावर बोर्ड मलम (Bordo paste) १:१:१० दोन वेळा म्हणजे पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात व पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यात लावावा. (८) हा रोग दिसताक्षणी ट्रायकोडर्मा हरजियानम अधिक ट्रायकोडर्मा ए स्पिरिलम अधिक सुडोमोनास फ्लोरन्स 100 ग्रॅम प्रत्येकी प्रति झाड एक किलो शेणखतात मिसळून झाडाचे परिघात जमिनीतून द्यावा.

 

(B) शेंडे मर :

या रोगात संत्र्याच्या कोवळ्या तसेच पक्व हिरव्या फांद्या खांद्या शेंड्यापासून खाली वाळतात व त्यामुळे फाद्यावरील पाने पिवळी पडतात व गळतात. फांदीचा शेंड्यापासून खाली वाळत आलेला भाग पांढुरका दिसतो व त्यावर सूक्ष्म काळ्या गोल पुटकुळ्या दिसतात. या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो.
व्यवस्थापन योजना : या रोगाच्या व्यवस्थापनासाठी झाडावरील रोगट वाळलेल्या फांद्या म्हणजे सल पावसाळ्यापूर्वी काढून जाळून टाकाव्यात.

( C) पाय कुज व मूळकूज :

या रोगात झाडाच्या कलम युती चा भाग जमिनीत गाडल्या गेल्यास तेथे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. नंतर हा प्रादुर्भाव खोडावर व मुळावर पसरतो. या रोगात झाडाची मुळे कुजतात व बुंधाची साल कुजते . पाने निस्तेज होऊन शिरा पिवळ्या पडतात व फळेही गळतात.फाद्या आणि खोडाचा भाग काळसर दिसू लागतो. मोठ्या मुळ्या कुजण्याचे प्रमाण हळूहळू दिसू लागते अशावेळी संपूर्ण झाड वाळण्याची शक्यता असते.

व्यवस्थापन योजना : (१) या रोगाच्या व्यवस्थापनासाठी रोगग्रस्त संत्रा झाडाचा संपूर्ण वाफा खोदून झाडाच्या मुळ्या उघड्या कराव्यात व व सडलेल्या मुळ्या काढून टाकाव्यात (२) वर निर्देशित उपायोजना झाल्यानंतर Cymoxnil 8 percent+ Mancozeb 64 percent डब्ल्यू हे मिश्रण बुरशीनाशक हे मिश्रण बुरशीनाशक 25 ग्रॅम अधिक 50 मिली जवस तेल अधिक दहा लिटर पाण्यात घेऊन झाडाच्या परिघामध्ये मिसळावे किंवा आळवणी करावी व मातीने वाफा झाकून घ्यावा.

(D) कोळशी :

शेतकरी बंधूंनो संत्रा पिकावरील काळ्या पांढर्‍या माशीच्या प्रादुर्भावामुळे ती पानातील रस शोषण तर करतेच बरोबर आपल्या शरीरामधून चिकट स्त्राव बाहेर टाकते आणि कालांतराने या चिकट द्रवावर काया बुरशीची वाढ होते यालाच कोळशी असे म्हणतात. उष्ण व दमट हवामानात कोळशीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. तिव्र प्रादुर्भाव झाल्यास पाने फांद्या फळे व संपूर्ण झाड काळे पडते.

व्यवस्थापन योजना :

शेतकरी बंधूंनो कोळशीच्या प्रतिबंध करिता या रोगासाठी कारणीभूत असलेली काळी पांढरी माशी या किडीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे त्याकरिता निंबोळी तेल 100 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन संत्र्याच्या झाडाला मृग हस्त आणि आंबिया बहरा चा नवती चा कालावधी लक्षात घेऊन निंबोळी तेल 100 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी व पहिल्या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी पुन्हा एक फवारणी घ्यावी. शेतकरी बंधूंनो निंबोळी तेल पाण्यात मिसळण्या करिता 100 मिली निंबोळी तेलात दहा ग्रॅम डिटर्जंट मिसळावे. शेतकरी बंधूंनो मृग बहारातील फवारणी करताना संत्रा वरील पानावरील ठिपके या रोगासाठी कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 25 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.

(E) Tristiza किंवा जलद रास :

हा विषाणूजन्य रोग असून या रोगात चे मुख्य लक्षण म्हणजे रोगग्रस्त झाडाला नवीन फूट न येणे किंवा नवीन फुट आली तर ती अत्यल्प येणे. या रोगात पानाचा हिरवेपणा व ताजेपणा कमी होतो. या रोगात पानाचा हिरवेपणा व तजेलदारपणा कमी होतो संपूर्ण झाड मलूल झालेले दिसते. अशा झाडाची पाणी थोड्या कालावधीत गळून जातात व झाडांचा ऱ्हास होतो. रास झालेल्या झाडावरील फळे न गळता लटकलेली दिसतात. दुसऱ्या प्रकारात झाडाची पाने मलूल होऊन शिरा सहित पिवळी पडून हळूहळू गळतात त्यामुळे झाडावरील पाणी विरळ होतात व फांद्या शेंड्याकडून मरण्यास सुरुवात होते. याला झाडाचा मंद रास म्हणतात. रोगग्रस्त झाडांना रोगग्रस्त झाडांना रोगग्रस्त झाडांना निरोगी झाडापेक्षा अधिक फुले व फळे लागतात. फळे आकाराने लहान राहतात पिवळी पडतात पण गळत नाही.

व्यवस्थापन योजना : (१) रोगमुक्त रोपाची लागवड करावी व रोपे बंदिस्त मावा विरहीत रोपवाटिकेत तयार झाले याची खातरजमा करून घ्यावी जमा करून घ्यावी. (२) रोपे तयार करण्यासाठी वापरात येणाऱ्या अवजाराचे सोडियम हायपोक्लोराईड च्या एक ते दोन टक्के द्रावणात निर्जंतुकीकरण करून घ्यावे.(३) Tristiza वाहक मावा किडीचे व्यवस्थापनासाठी शिफारशीत उपाय योजना कराव्यात.

(F) सायट्रस ग्रीनिंग:

हा जिवाणूजन्य रोग असून या रोगात प्राथमिक लक्षण म्हणजे प्रादुर्भाव झालेल्या पानावर चट्टे आढळतात. हे चटके पानाच्या दोन्ही बाजूस कमी-अधिक प्रमाणात दिसतात. पानाच्या खालच्या बाजूच्या शिरा फुगतात व त्यानंतर शिरांमध्ये पानाचा भाग पिवळा होण्यास सुरुवात होते. हा पिवळेपणा सुद्धा मध्य शिर्‍याच्या दोन्ही बाजू सारखा नसतो. आणि शेवटी पाने संपूर्णपणे पिवळे होतात. यापैकी बऱ्याच पानावर अनेक हिरवे की अजून येतात. रोगट पाने आकाराने लहान होऊन खांद्यावर उभट सरळ होतात. रोगाचा प्रसार सायला नावाच्या किडी द्वारेमोठ्या प्रमाणात होतो.

 

व्यवस्थापन योजना:

(१) लागवडीसाठी रोगमुक्त कलमाचा वापर करावा. (२) रोगग्रस्त फांद्या तीस ते चाळीस सेंटीमीटर निरोगी फांदी सह कट कराव्यात. (३) प्रत्येक नवीन पालवी फुटण्याच्या वेळेस शिफारशीप्रमाणे व्यवस्थापन योजना अमलात आणून साइट्रस सिला या किडीचे व्यवस्थापन करावे.
शेतकरी बंधूंनो गरजेनुसार वर निर्देशित संत्रा वरील रोगा संदर्भात तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य निदान करून शिफारशीत उपाययोजनांची गरजेनुसार अंमलबजावणी करावी. कोणतीही कीडनाशके वापरतांना लेबल किरण शिफारशीची खातरजमा करून घ्यावी अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करणे टाळावे प्रमाण पाळावे तसेच रसायने वापरतांना सुरक्षा कि किड्स वापर करावा. गरजेनुसार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच योग्य निदान करून उपाययोजना गरजेनुसार वापरावी.

लेखक- राजेश डवरे कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम
प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Major diseases of orange crop and their management Published on: 15 May 2021, 03:46 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters