1. बातम्या

21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत ऑरगॅनिक फूड फेस्टिव्हलचे आयोजन

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
 सेंद्रीय शेती संबंधित उद्योग करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने  केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने 21 ते 23 फेब्रुवारी 2020 पर्यंत 'ऑरगॅनिक फूड फेस्टिव्हल' चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे होणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये महाराष्ट्रातील 8 दालने राहतील.

‘ऑरगॅनिक फुड फेस्टिव्हल’ मध्ये एकूण 150 दालने असतील. यामध्ये सर्व राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्या महिला, संबंधित उद्योजिका सहभागी होणार असल्याचे श्रीमती कौर यांनी सांगितले. मुख्यत: महिला बचत गट, सहकारी शेतीच्या माध्यमातून सेंद्रीय शेती आणि उद्योग करणाऱ्या महिलांचा समावेश या प्रदर्शनात राहील.

सेंद्रीय शेत जमीन आणि सर्वाधिक सेंद्रीय उत्पादन करण्यामध्ये  भारताचा जगात नववा क्रमांक लागतो. यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे श्रीमती कौर म्हणाल्या. भारतात जवळपास 1.70 दशलक्ष मेट्रिक टन प्रमाणित सेंद्रीय उत्पादन होते. यामध्ये तेलबिया, ऊस, डाळी, बाजरी, तृणधान्य,कापूस, औषधी वनस्पती, चहा, कॉफी, फळे-भाज्या, मसाले, ड्राय फ्रुट, यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सेंद्रीय पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता भारतात मोठी संधी असून या आयोजनाने उत्पादकांचा फायदा होईल, अशी अपेक्षा श्रीमती कौर यांनी व्यक्त केली. सेंद्रीय शेती अधिकाधिक शेतकऱ्यांनी करावी यासाठी ‘पंरपरागत कृषी विकास योजना’ केंद्र सरकारने सुरू केली आहे. यासह महिलांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीसाठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्रीय अन्न प्रकिया उद्योक मंत्रालय आणि माहिला व बाल कल्याण मंत्रालयामध्ये सामंजस्य करार झाला असल्याची माहिती श्रीमती कौर ने यावेळी दिली.   

असे असेल प्रदर्शन

आयोजित प्रदर्शनात सेंद्रीय खाद्य पदार्थ वस्तूंची विक्री केली जाणार आहे. सहभागी महिलांना अत्याधुनिक प्रशिक्षण याठिकाणी देण्यात येईल. विक्रेत्यांशी करार, नेटवर्किंग, यशस्वी शेतकरी माहिला-उद्योजिकांची खास मुलाखत, आहारतज्ञांचे सत्र, सुप्रसिद्ध शेफद्वारे पाककृतीचे प्रात्यक्षिके. सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters