परभणी कृषी विद्यापीठाच्या 48 व्‍या वर्धापन दिनी ऑनलाईन कृषि संवादाचे आयोजन

17 May 2020 08:57 AM By: KJ Maharashtra


परभणी:
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने दिनांक १८ मे रोजी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्‍त दरवर्षी खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करून साजरा करण्‍यात येतो. परंतु यावर्षी कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव व राज्‍यात लॉकडाऊनच्‍या पार्श्‍वभुमीवर यावर्षीचा खरिप शेतकरी मेळावा रद्द करण्‍यात आला असुन ऑनलाईन कृषि संवाद कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक १८ मे रोजी सकाळी ११.०० वाजता करण्‍यात आले आहे.

ऑनलाईन कृषि संवादात महाराष्‍ट्राचे कृषिमंत्री माननीय नामदार श्री. दादाजी भुसे हे विशेष अथिती म्‍हणुन सहभागी होऊन शेतकरी बांधवांना संबोधीत करणार आहेत. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण राहणार असुन पुणे येथील अटारीचे संचालक डॉ. लाखन सिंग कार्यक्रमात प्रमुख सहभाग आहेत. या कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर आदींचा सहभाग राहणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन झुम मि‍टींग सॉफ्टवेअरच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात येणार असुन शेतकरी बांधवानी झुम मिटींग सॉफ्टवेअर आपल्‍या मोबाईल मध्‍ये डाऊनलोड करून मिटिंग आयडी 382 912 7898 वर पासवर्ड 229000 टाकुन सहभाग नोंदवावा.

सदरिल कार्यक्रमात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ खरिप हंगामातील कापुस, सोयाबीन, तुर लागवड तंत्रज्ञान व इतर कृषि तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करणार असुन सहभागी शेतकऱ्यांच्या निवडक प्रश्‍नांना उत्‍तर देणार आहेत. तरी सदरिल ऑनलाईन कृषि संवाद कार्यक्रमात शेतकरी बांधवानी सहभागी व्‍हावे, असे आवाहन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. संतोष आळसे, नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. गोपाल शिंदे यांनी केले आहे. या संपुर्ण कार्यक्रमाचे प्रक्षेपण विद्यापीठाच्‍या युटयुब चॅनेल www.youtube/user/vnmkv वर उपलब्ध होणार आहे.

kharif shetkari melava खरीप शेतकरी मेळावा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani लॉकडाऊन lockdown झूम मिटिंग zoom meeting
English Summary: Organizing online agricultural discussion on the 48th anniversary of parbhani agricultural university

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.