अकोला कृषी विद्यापीठ शहीद दिवसाच्या निमित्ताने कृषी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम तसेच गांजर गवत निर्मूलन सप्ताह साजरा करण्यात आला यानिमित्त कृषी महाविद्यालयाच्या रा. से.यो.च्या विद्यार्थ्यांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये गांजर गवत निर्मूलन जनजागृती करण्यात आली. तसेच वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबवून कृषी महाविद्यालय येथे शहीद दिन साजरा केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ. पी. के. नागरे सर संहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय, अकोला यांची उपस्थिती लाभली, यांनी विद्यार्थ्यांना निसर्गामध्ये वृक्षांचे महत्त्व आणि वृक्षांच्या अभावामुळे होणारे ऋतुचक्रामध्ये मधील बदल याबद्दल मार्गदर्शन केले, तसेच डॉ. डी. पी. धुळे यांनी विद्यार्थ्यांना गांजर गवतामुळे पर्यावरणाला तसेच मानवी शरीरावर होणारे नुकसान व त्याचे निर्मूलन पद्धती याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येमध्ये उपस्थिती दर्शवून मोठ्या संख्येने वृक्षांची लागवड केली तसेच महाविद्यालय परिसरातील गांजर गवताचे निर्मूलन केले.Eradication of carrot grass in the college premises.कार्यक्रम प्रसंगी डॉ. प्रकाश. गीते,डॉ. मनोज. तोटावर, डॉ. संजय कोकाटे, डॉ. एम. मारावर, डॉ. एन.एम.काळे, डॉ. गिरीश जेऊघाले, डॉ. अनिल खाडे, प्रा. वीरेंद्र ठाकूर, डॉ. जी. जे. भगत,
डॉ.गायकवाड मॅडम, डॉ.काटोले मॅडम, डॉ. चिकटे मॅडम ,डॉ.कणसे मॅडम,प्रा.वाय.सानप मॅडम, प्रा. मोरे मॅडम,इत्यादी प्राध्यापकांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल खाडे सर यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच सर्व विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.
संकलन - कन्हैया गावंडे.
Share your comments