ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा पुणे व इस्राइल केमिकल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने द्राक्ष व डाळिंब पीक परिसंवादाचे आयोजन दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमास ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र दादा पवार, अनंत कुलकर्णी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, इस्राइल केमिकल लिमिटेड, मेनाचेम असारफ, शास्त्रज्ञ, इस्राईल, डॉ. उरी, शास्त्रज्ञ, इस्राईल, उपस्थित होते.
तसेच भाऊसाहेब काटे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र डाळिंब संघ, शिवाजी पवार, अध्यक्ष महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ, डॉ. प्रशांत निकुंभे, शास्त्रज्ञ, द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे, डॉ. युक्ती वर्मा, शास्त्रज्ञ, द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे, डॉ. सोमनाथ पोखरे, शास्त्रज्ञ, डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर. वैभव तांबे, उपविभागीय कृषी अधिकारी, बारामती, डॉ धीरज शिंदे, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, सौ.सुप्रिया बांदल, तालुका कृषी अधिकारी, बारामती, हे उपस्थित होते.
यावेळी अनंत कुलकर्णी यांनी कंपनीमार्फत माती परीक्षण आधारे खते व्यवस्थापन, तसेच पानदेठ परीक्षणासाठी सॉफ्टवेअरवर काम सुरू असल्याचे सांगितले. यामुळे झाडातील मुख्य व दुय्यम खताची कमतरता समजून घेऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, असे ते म्हणाले. मेनाचेम यांनी कंपनीमार्फत साडेसात वर्षांमध्ये विविध पिकामध्ये 55 खताच्या मात्रा संशोधन व शिफारस केल्याचे सांगितले.
तसेच, 100 पिकांवरील खतांच्या मात्रेवर संशोधन चालू आहे त्यामधून लोकांचे खतावरील ज्ञान वाढवणे तसेच पूर्ण खताचे नियोजन व झाडावरील योग्य रित्या व्यवस्थापनाबाबत संशोधन करून शिक्षणासाठी व शेतीसाठी त्याचा उपयोग करणार आहे असे सांगितले. उरी यांनी डाळिंबामध्ये नत्र, स्फुरद, पालाश या खतांचा डोस डाळिंब पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेत दिल्यानंतर शेतकऱ्यांसाठी उपयोग असलेल्या खत मात्रा शोधून काढल्याचे सांगितले.
'काटामारीतून कारखानदार टाकतात ४५८१ कोटींचा दरोडा'
अशाप्रकारे खत मात्रा दिल्यास फळांची गुणवत्ता, पिकावरील रोग कीड नियंत्रण ,अधिक उत्पादन या सर्वांवरती योग्य परिणाम होऊन आम्हाला चांगला रिझल्ट आला आहे. शेतकरी डाळिंबाला नत्राचा वापर जास्त करत असल्यामुळे फळांमधील दाणे कुजतात, उन्हामध्ये फळांची कॉलिटी कमी होते, फळांना क्रॅकिंग जाते, तेल्या रोग येतो व फळांची कुज होते.
डाळिंब पिकांना 40 ते 70 पीपीएम नत्र परिणाम कारक आहे हे संशोधन मधून कळले आहे. त्यामुळे प्रकाश संश्लेषण चांगले होते, झाडाची वाढ चांगली होते. सगीकार्ड यांनी जागतिक पातळीवरती क्रॉप ॲडव्हजरी टूल्स साठी डेटा एकत्र करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. एखाद्या पिकांचे किती उत्पादन पाहिजे त्यासाठी त्या पिकास खताची शिफारसी दिली जाते तसेच पाणी परीक्षणामार्फत त्या पिकांमधील अन्यद्रव्याच्या गरजा लक्षात घेऊन खताचे मात्रा जास्त व कमी देता येईल का असे संशोधन होत आहे. त्यामुळे शाश्वत शेतीचा उपयोग होणार आहे तसेच कार्बन उत्सर्जन कमी करेल.
कांद्याच्या दरात घसरण, तरीही राज्यात मोठ्या प्रमाणावर लागवड
डॉ. प्रशांत निकुंभे यांनी द्राक्ष पिकात कॅनोपी व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. डॉ. सोमनाथ पोखरे यांनी डाळिंब पिकात कीड व रोग बाबत मार्गदर्शन केले. डॉ. युक्ती वर्मा यांनी द्राक्ष झाडावरील खताचे व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम आप्पासाहेब पवार हॉलमध्ये संपन्न झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संजय बिराजदार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मिलिंद जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर श्री. संतोष गोडसे यांनी आभार मानले.
महत्वाच्या बातम्या;
थारला टक्कर देण्यासाठी मारुती जिमनी लवकरच लॉन्च, किंमतही आपल्या बजेटमध्ये..
शेतकऱ्यांनो अधिक दुग्धोत्पादनासाठी असा करा मुरघास तयार, जाणून घ्या...
मुख्यमंत्री साहेब, आम्ही बिहारमध्ये राहतो का? शेतकऱ्याचे रक्ताने लिहिलेले पत्र व्हायरल..
Share your comments